तरुण भारत

कॅम्प येथील महिला दोन महिन्यांपासून बेपत्ता

कॅम्प पोलीस स्थानकात एफआयआर

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

मोची गल्ली, कॅम्प येथील एक महिला गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता झाली आहे. यासंबंधी तिच्या पतीने कॅम्प पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.

माधवी उमेश कामटे (वय 35) असे तिचे नाव आहे. 16 मार्च रोजी सकाळी 10 वाजता ब्युटीपार्लरला कामाला जाण्याचे सांगून माधवी आपल्या घराबाहेर पडली होती. ती अद्याप घरी परतली नाही. पती उमेश कामटे यांनी मंगळवारी कॅम्प पोलीस स्थानकात फिर्याद नोंदविली आहे.

5.6 फूट उंची, गहू वर्ण, गोल चेहरा, सरळ नाक असे तिचे वर्णन आहे. घराबाहेर पडताना या महिलेने काळी चुडीदार परिधान केली होती. ती तेलगु, कन्नड, मराठी व हिंदी बोलते. या महिले विषयी कोणाला माहिती मिळाल्यास कॅम्प पोलीस स्थानकाशी 0831-2405234 या क्रमांकाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.#ta

Related Stories

सी-बर्ड प्रकल्पाला आज देणार भेट

Amit Kulkarni

गणेशपुरी रेसिडेंट सोसायटीची तातडीची बैठक वादळी

Patil_p

शहापूर श्रीराम मंदिरात हरिनाम सप्ताह उत्साहात

Amit Kulkarni

मराठा मंडळ फार्मसीमध्ये ‘फार्मासिस्ट डे’ साजरा

Amit Kulkarni

ताण टाळा… हृदयाला जपा…

Patil_p

अलतगा माळीभरम मंदिराचा लोकार्पण सोहळा

Amit Kulkarni
error: Content is protected !!