तरुण भारत

मुंबईतील तिन्ही मैदाने रेड झोनमध्ये : सराव ठप्पच

मुंबई / वृत्तसंस्था

रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे यांच्यासारख्या अव्वल खेळाडूंना सरावासाठी आणखी बरीच प्रतीक्षा करावी लागू शकते, असे सध्याचे संकेत आहेत. महाराष्ट्र सरकारने ग्रीन व ऑरेंज झोनमधील सर्व स्टेडियम्समध्ये प्रेक्षकांविना सरावाची परवानगी जरुर दिली. पण, मुंबईतील वानखेडे, ब्रेबॉर्न व कांदिवली येथील तिन्ही स्टेडियम्स रेड झोनमध्ये येत असल्याने यातील एकाही ठिकाणी खेळाडूंना सरावासाठी प्रवेश दिला जाणार नाही. ठाणे, नवी मुंबई, मिरा भायंदर, वसई-विरार व कल्याणöडोंबिवली सध्या रेड झोन म्हणून जाहीर केले गेले आहेत.

‘सरकारने क्रीडा संकुल व स्टेडियम्स खुले करण्याबाबत जे दिशानिर्देश दिले आहेत, त्याची आम्ही काटेकोर अंमलबजावणी करत आहोत. रेड झोनमध्ये असताना स्टेडियम्स, क्रीडा संकुले पूर्णपणे बंद असतील’, असे मुंबई क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱयाने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

मुंबई क्रिकेट संघटनेचे वानखेडे स्टेडियम, बांद्रा कुर्ला संकुल व कांदिवलीतील सचिन तेंडुलकर जिमखाना अशी तीन मैदाने आहेत. पण, हे तिन्ही विभाग रेड झोनमध्ये येत असल्याने ती पूर्णपणे बंद असतील. मरिन ड्राईव्ह परिसरातील ब्रेबॉर्न स्टेडियमवर देखील क्रिकेट सराव सुरु होणार नाही. क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या एका पदाधिकाऱयाने आपल्याला प्रशासनाच्या पुढील सूचनेची प्रतीक्षा आहे, असे यावेळी सांगितले.

मुंबईला कोव्हिड-19 चा सर्वाधिक फटका बसला असून मंगळवारी एकाच दिवशी 1411 नवे रुग्ण आढळून आले होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारपर्यंत मुंबईत 800 जणांना कोव्हिड-19 मुळे प्राण गमवावे लागले आहेत.

Related Stories

टोकियो ऑलिंपिक कुस्ती पात्र फेरी स्पर्धेच्या ठिकाणात बदल नाही

Patil_p

भारत-ओमान यांच्यात आज फुटबॉल सामना

Patil_p

भारत विजयापासून सात पावलांवर

Patil_p

भारतीय संघाला दंड

Patil_p

विंडीजचा लंकेविरुद्ध मालिकाविजय

Patil_p

महाराष्ट्राच्या 21 व्या कबड्डी दिनाचा कौतुक सोहळा रद्द!

Patil_p
error: Content is protected !!