तरुण भारत

निम्याहून अधिक बाधित झाले कोरोनामुक्त

बुधवारी आणखी दोघा जणांना घरी पाठविले : प्रशासनाला 356 अहवालांची प्रतीक्षा

प्रतिनिधी/ बेळगाव

कोरोनाची लागण झाल्याने सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलेले निम्याहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत. बुधवारी आणखी दोघांना घरी पाठविण्यात आले असून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 69 वर पोहोचली आहे.

कुडची येथील रुग्ण क्रमांक 575 व 576 यांना बुधवारी सकाळी घरी पाठविण्यात आले. बिम्स प्रशासनाने एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. आतापर्यंत लागण झालेल्या 110 पैकी 69 जण बरे झाले आहेत. तर 48 जणांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत.

राज्य आरोग्य विभागाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये बुधवारी बेळगावातील रुग्णांचा समावेश नव्हता. जिल्हा सर्व्हेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 7 हजार 417 जणांचे सॅम्पल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी 6 हजार 816 जणांचे निगेटिव्ह तर 110 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

1 हजार 606 जणांना 14 दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. तर जिल्हय़ातील 8 हजार 713 जणांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यात आले आहे. प्रशासनाला आणखी 356 अहवालांची प्रतीक्षा असून एक-दोन दिवसात प्रयोग शाळेतून हे अहवाल उपलब्ध होणार आहेत. खासकरून मुंबईहून बेळगावला परतलेल्या गर्भवती महिलेसह दोघा जणांच्या संपर्कातील लोकांचा अहवाल काय असणार? याकडे आरोग्य विभागाचे लक्ष लागून आहे.

महिलेचा आत्महत्येचा इशारा

मुंबईहून आलेल्या व क्वारंटाईनमध्ये असलेल्या एका डॉक्टर महिलेने जिल्हा प्रशासनावर टीका करत आत्महत्येची धमकी दिली आहे. त्यामुळे मनपाच्या अधिकाऱयांनी त्या महिलेला समज देण्यासंबंधी खडेबाजार पोलिसांकडे तक्रार केली आहे. डॉक्टर महिला व तिच्या पतीला एका लॉजमध्ये संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. मुंबईहून परतल्यानंतर सीपीएड मैदानावर जाऊन नावनोंदणी करा, असा सांगण्यात आले होते. मात्र या दोघांनी थेट घर गाठले. त्यामुळे त्यांचा शोध घेऊन त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. हा आपल्यावर झालेला अन्याय आहे, अशी भावना त्या डॉक्टर महिलेने व्यक्त केली असून प्रशासनावर टीका केली आहे. म्हणून तिला समज देण्याची मागणी मनपा अधिकाऱयांनी केली आहे.

Related Stories

तिहेरी अपघातात खणगावचा तरुण ठार

Patil_p

भावाच्या मृत्यू पाठोपाठ दोन बहिणींही सोडले प्राण

Patil_p

उघडय़ावरील मॅनहोल धोकादायक

Patil_p

हिडकलमधून जादा पाणी मिळूनही शहरात पाणीटंचाई

Patil_p

रघुनाथपेठ,अनगोळ येथील पथदीप 15 दिवसांपासून बंद

Rohan_P

गोकाक तालुक्यात 48 जणांना कोरोना

Patil_p
error: Content is protected !!