तरुण भारत

दुसऱया दिवशी प्रवाशांचा अल्पप्रतिसाद

बेळगाव / प्रतिनिधी

साधारण 22 मार्चपासून बंद असलेल्या बससेवेला मंगळवारपासून सुरुवात झाली. मात्र कोरोनाच्या भीतीमुळे प्रवाशांची संख्या तुरळक आहे. लॉकडाऊन शिथिल झालेल्या दुसऱया दिवशीही प्रवाशांची संख्या कमी होती. त्यामुळे काही बसेस जाग्यावरच थांबून होत्या.

Advertisements

राज्यभरात मंगळवारपासून लॉकडाऊनमध्ये आणखी शिथिलता देण्यात आल्याने परिवहन मंडळाच्या बसेसना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सर्व बसस्थानकांतून बसेस धावत असल्या तरी प्रवाशांची संख्या कमी आहे. बसस्थानकातून अनगोळ, वडगाव, सहय़ाद्रीनगर, देवराज अर्स कॉलनी, अलारवाड, रामतीर्थनगर, कणबर्गी आदी ठिकाणी बससेवा सुरू आहे. ग्रामीण भागातील होनगा, काकती, संतिबस्तवाड, जानेवाडी, किणये, मुचंडी, हंदिगनूर आदी भागात बस सुरू असल्या तरी प्रवाशांची संख्या कमी झाल्याने एक-दोन फेऱया होत आहेत. काही बसेस प्रवाशांविना रिकाम्या धावताना दिसत आहेत. स्थानिक बसेस सुरू असल्या तरी लांब पल्ल्याच्या बसेस प्रवाशांविना थांबून असल्याचे पाहायला मिळत आहे.

बसस्थानकात बुकिंगला सुरुवात करण्यात आली असून सकाळी 7 ते 9 या वेळेत बुकिंग सुरू आहे. सध्या फक्त विजापूर आणि बेंगळूरला जाणाऱया प्रवाशांचे बुकींग केले जात आहे. परिवहन अधिकाऱयांनी ऑनलाईन तिकिटे बुकींग करण्याचे आवाहन केले आहे. त्याबरोबर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून परिवहन मंडळाने काही नियम केले असून ते पाळूनच प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. बसस्थानकात प्रवेश करण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी एकच मार्ग खुला ठेवण्यात आला आहे. शिवाय बसस्थानकावर सामाजिक अंतर राखून प्रवेश करणाऱया प्रत्येक प्रवाशाचे थर्मल स्क्रिनिंग केले जात आहे.

शहरात निर्बंधित क्षेत्र वगळता इतर सर्वत्र बसेस धावत आहेत. प्रवासादरम्यान बसचालक, बसवाहक यासह प्रवासी मास्क घालून प्रवास करत आहेत. बसस्थानकातून निघण्यापूर्वी व बसस्थानकात पोहोचल्यानंतर बसेस सॅनिटाईज केल्या जात आहेत. 

Related Stories

अवरादी येथे साडेतीन किलो गांजा जप्त

Patil_p

दोन ठिकाणी मटका अड्डय़ांवर छापे; 26 अटकेत

Amit Kulkarni

अधिकृत आदेश येईपर्यंत सलून उघडू नका

Patil_p

टँकरची स्कुटीला धडक; बाप-मुलगी ठार

Patil_p

पोलिसांकडून फटाके विक्रीवर बंदी

Patil_p

बेंगळूर-जयपूर व्हाया बेळगाव धावणार रेल्वेची पार्सल एक्स्प्रेस

Patil_p
error: Content is protected !!