तरुण भारत

विजयनगर परिसरात मनोज पावशे यांच्यावतीने औषध वितरण

प्रतिनिधी / बेळगाव

कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोनाविरोधात लढण्यासाठी रोगप्रतिकार शक्तीची गरज आहे. त्यासाठी आर्सेनिकम अल्बम-30 हे होमिओपॅथिक औषध महत्त्वाचे आहे. सर्वसामान्य जनतेला हे औषध मिळणे कठीण असल्याने महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मनोज पावशे यांनी ते उपलब्ध करून विजयनगर परिसरात वितरित केले.

Advertisements

सरकारच्या आयुष विभागाने मान्यता दिलेल्या बुस्टर डोसबद्दल प्रथम डॉ. बसवराज यांनी माहिती दिली. कोरोनापासून सतर्क राहणे गरजेचे आहे. सरकारने आणि आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे हे आपले कर्तव्य असून ते करत असताना रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी हे होमिओपॅथिक औषध प्रत्येकाने घ्यावे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी मनोज पावशे यांनीही आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाला हिंडलगा ग्राम पंचायतीचे सदस्य मिथून उसुलकर, प्रमुख पाहुणे मृणाल हेब्बाळकर, किरण मोदगेकर यांच्यासह विशाल चौगुले, योगेश बेळगावकर, संजय पाटील, प्रवीण मर्डी, किरण भातकांडे, अभय सपकाळे, सोमनाथ शिंदे व नागरिक उपस्थित होते. यावेळी 250 हून अधिक जणांना बुस्टर डोस देण्यात आला.   

Related Stories

बुक लव्हर्स क्लबच्या कार्यक्रमात प्रा. पुष्पा भावेंच्या जीवनाचा आढावा

Patil_p

संकल्प आमोणकर यांच्याकडून मोटरसायकल व रिक्षा टॅक्सी व्यवसायीकांना सवलतीच्या दरात इंधन,

Amit Kulkarni

भोज येथे आदर्श पंचकल्याण महोत्सवास प्रारंभ

Omkar B

यमकनमर्डी अपघातात कडोलीचा तरुण ठार

Patil_p

नंदगडमध्ये हमीभावाने भात खरेदीसाठी नोंदणी सुरू

Omkar B

कपिलनाथ युवक मंडळातर्फे मास्क-सॅनिटायझरचे वाटप

Amit Kulkarni
error: Content is protected !!