तरुण भारत

सोनिया गांधींवर कर्नाटकात गुन्हा दाखल

ऑनलाईन टीम / बेंगळूर : 

पीएम केअर्स फंडाविरोधात जनतेची दिशाभूल केल्याप्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरोधात शिवमोगामधील सागर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisements

कर्नाटकातील वकील के. व्ही. प्रवीण यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सोनिया गांधींविरोधात भारतीय दंड विधान कलम 153 आणि 505 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

कोरोना विरोधातील लढाईच्या मदतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी PM CARES Fund (प्राईम मिनिस्टर सिटीझन असिस्टन्स अँड रिलीफ इन इमर्जन्सी सिच्युएशन फंड) स्थापन केला. या फंडाबाबत काँग्रेसच्या ट्विटर हॅण्डलवरुन दिशाभूल करणारे ट्वीट केल्याचा आरोप वकील के प्रवीण यांनी केला आहे. सोनिया गांधींवर गुन्हा दाखल झाल्याने आता काँग्रेस आणि भाजपमधील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

Related Stories

कोरोना लढ्यासाठी टिक टॉक कडून 100 कोटींची मदत

prashant_c

महाराष्ट्रात रुग्ण संख्या अधिक असताना लस कमी का ? : राजेश टोपे

pradnya p

देशात दिवसभरात नवीन 4 लाखांहून अधिक रुग्ण

Amit Kulkarni

पुत्र व्हावा ऐसा ‘गुंडा’…

Patil_p

एनएसडीच्या अध्यक्षपदी अभिनेते परेश रावल

Patil_p

महिला अधिकाऱयाकडे बचाव पथकाचे नेतृत्व

Patil_p
error: Content is protected !!