तरुण भारत

सिंधुदुर्गातील सलून तब्बल 62 दिवसांनी उघडणार

दोन खुर्च्यांमध्ये हवे सहा फुटांचे अंतर : ग्राहकांची नोंदवही आवश्यक : सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत दुकाने सुरू राहणार

प्रतिनिधी / मालवण:

Advertisements

  लॉकडाऊननंतर तब्बल 62 दिवसांनी शुक्रवारपासून सिंधुदुर्गातील सलून व्यवसाय सुरू होणार आहेत. शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करतात, सलून व्यवसाय सुरू करण्यास जिल्हाधिकारी आणि परवानगी दिल्याने त्या-त्या ठिकाणच्या स्थानिक प्रशासनाने सलून संघटनेला अटी व शर्तीच्या अधीन राहून सलून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे नाभिक समाज बांधवांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. गेले 62 दिवस सलून व्यवसाय सुरू करण्यासाठी नाभिक समाज बांधव आणि सलून कारागिर प्रयत्नात होते. मात्र, केंद्र शासनाने सलून व्यवसाय सुरू करण्यास बंदी घातली होती. आता जाहीर झालेले लॉकडाऊन 4 मध्ये सलून व्यवसाय सुरू करण्यास सशर्त परवानगी मिळाली असल्याने शुक्रवारपासून हे व्यवसाय पुन्हा सुरू होणार आहेत.

 शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 हा 13 मार्चपासून लागू करून खंड 2, 3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. शासनाने या आदेशान्वये चौथ्या लॉकडाऊनबाबत आदेश निर्गमित केलेले आहेत. त्यानुसार केशकर्तन व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी दिलेली आहे.

दोन खुर्च्यांमध्ये हवे सहा फुटांचे अंतर

 मुख्याधिकाऱयांनी दिलेल्या परवानगीमध्ये म्हटले आहे, सलून व्यवसाय उच्च जोखीम (हाय रिस्क) मध्ये येत असल्याने वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता तसेच निर्जंतूकीकरण यांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. हा व्यवसाय सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत करायचा असून जास्तीत जास्त 2 खुर्च्या ठेवणे व दोन खुर्च्यांमधील अंतर 6 फूट असणे आवश्यक आहे. जर सहा फूट अंतर नसेल, तर केवळ एकच खुर्ची लावायची आहे. तसेच दुकानात येणाऱया सर्व ग्राहकांची नोंदवही ठेवणे बंधनकारक आहे. त्यात (नाव, मोबाईल नंबर, पत्ता) दुकानात ग्राहकाला प्रतीक्षेत ठेवता येणार नाही. (S.M.S.) सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायझर/ साबण वापरणे ग्राहक व कारागिर यांना बंधनकारक आहे. ग्राहकांसाठी वापरण्यात येणारी हत्यारे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक आहे. तंबाखू, मावा यांचे सेवन प्रतिबंधित आहे. केशकर्तनासाठी वापरण्यात येणारे ऍप्रोन, नॅपकीन व इतर साधने रोज धुवून घेणे बंधनकारक आहे. सर्दी, ताप, खोकला यासारखे रोगाचे लक्षण असलेले ग्राहक असल्यास तात्काळ मालवण ग्रामीण रुग्णालयात संपर्क साधावा, असे मुख्याधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.

अन्यथा दंडात्मक कारवाई

 सूचनांचे पालन न केल्यास व कोणत्याही ग्राहकाच्या व दुकानदाराच्या बेजबाबदार वर्तणूकीमुळे कोविड साथ पसरण्याचा धोका उद्भवल्यास संबंधितांवर साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी स्पष्ट केले आहे.

 नियमांचे पालन करून करणारा व्यवसाय-विजय चव्हाण

  गेले 62 दिवस नाभिक समाजबांधव व्यवसाय बंद असल्याने अडचणींच्या फेऱयातून जात होता. यात काही नाभिक व्यावसायिकांवर दंडात्मकही कारवाई करण्यात आली. सलून व्यवसाय आणि त्यामध्ये गुंतलेले कारागीर प्रचंड दडपणाखाली वावरताना दिसत होते. मात्र चौथ्या लॉकडाऊनमध्ये आम्हाला दिलासा देणारा निर्णय दिसून आला. सलून व्यावसायिक पहिल्यापासूनच स्वच्छतेचे सर्व नियम आणि आरोग्याची काळजी घेऊनच व्यवसाय करतात. आता शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करत आम्ही व्यवसाय करणार आहोत. ग्राहकांनी यासाठी सहकार्य करावे असे आवाहन नाभिक समाज महामंडळाचे राज्य उपाध्यक्ष विजय सीताराम चव्हाण यांनी केले आहे.

Related Stories

दापोलीतील नागरिकांच्या जागरूकतेमुळे तिघांना व्हावे लागले क्वारंटाईन

Abhijeet Shinde

अपघातग्रस्त डबे हटवण्याचे काम युध्दपातळीवर

Patil_p

सरपंचपदासाठी 11 रोजी होणार निवडणुका

NIKHIL_N

रत्नागिरीतील बोट बुडाली

NIKHIL_N

सिंधुदुर्गातील एकाच कुटुंबातील पाचजण कोरोना योद्धा

NIKHIL_N

कोरोना चाचण्यांची संख्या उद्यापासून वाढणार

Patil_p
error: Content is protected !!