तरुण भारत

सत्तरीतील अडीज हजार शौचालय उभारण्याच्या कामाला लवकरच सुरुवात

 गेल्या अनेक वर्षापासून सत्तरी तालुक्मयातील शौचालयाची समस्या यामुळे अनेक स्तरावर समस्या निर्माण होताना दिसत आहे .यामुळे आता येणाऱया काळात सत्तरी तालुक्मयातील प्रत्येक घरासाठी शौचालयाची योजना अमलात येणार असून सरकारने जारी केलेल्या शौचालय योजनेचा सत्तरी तालुक्मयातील सध्यातरी 2505 जणांना फायदा होणार आहे. यामुळे सत्तरी तालुक्मयातील शौचालय उभारण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ होणार असून

या संदर्भाचे सर्वेक्षण वेगवेगळय़ा पंचायत व नगरपालिका क्षेत्रामध्ये सुरू करण्यात आलेले आहे. सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्यानंतर खऱया अर्थाने शौचालय उभारण्याच्या कामाला प्रारंभ होणार असल्याची माहिती संबंधित सूत्राकडून उपलब्ध झाली आहे

Advertisements

येणाऱया काळात टप्प्याटप्प्याने संपूर्ण तालुका पुर्णपणे शौचालयाच्या जाळय़ात येणार आहे.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार सरकारने जारी केलेल्या परिपत्रकाचा आधार घेत ज्यांना या शौचालय योजनेचा लाभ उपलब्ध होणार आहे त्यांनी कागदपत्रे सोपस्कार पूर्ण केले असून पैकी सर्व जणांना शौचालय सुविधा मंजूर झालेली आहे. सत्तरी तालुक्मयातील एकूण बाराही ग्रामपंचायत क्षेत्रांमधील पर्ये ग्रामपंचायत क्षेत्रात सर्वापेक्षा जास्त 319 शौचालयांना मान्यता मिळाली असून ठाणे डोंगुर्ली पंचायतीत सर्वात कमी 81 शौचालय अर्जना मंजुरी मिळालेली आहे. यामुळे येणाऱया काळात लवकरच याची उभारणी फेब्रुवारीत सुरू होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. प्राप्त माहितीनुसार सत्तरी तालुक्मयांमध्ये  जवळपास साडेचार हजार पेक्षा जास्त शौचालयांची गरज असल्याचा अहवाल सरकारला सादर करण्यात आला होता. या संदर्भात खास सर्वेक्षण सुरू झाले असून ज्या घरांना शौचालयाची सुविधा उपलब्ध नाही व ज्यांचे आर्थिक उत्पन्न कमी आहे त्यांना या शौचालय योजनेचा लाभ देण्याच्या दृष्टीकोनातून सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे .या संदर्भाची एक यादी सरकारने प्रसिद्ध केली असून त्यात जवळपास साडेचार हजार पेक्षा जास्त नागरिकांना याचा फायदा होणार आहे.

 दरम्यानच्या काळात ज्यांना शौचालयाची सुविधा द्यायची असेल त्यांनी किमान दहा हजार रुपये भरून याचा लाभ घेण्यासाठी आवश्यक स्वरूपाची कागदपत्रे सोपस्कार पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते . त्याची पुर्तता करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना ही सुविधा मंजुरी झाली आहे. त्या संदर्भात चांगला प्रतिसाद मिळाला असून ज्यांनी कागदपत्रे सोपस्कार पूर्ण केलेले आहे त्यांना सर्वांना ही सुविधा मंजूर झालेली आहे .एकूण मिळालेल्या अधिक माहितीनुसार भिरोंडा ग्रामपंचायतीसाठी 196 खोतोडा ग्रामपंचायतीसाठी 187 ठाणे ग्रामपंचायतीसाठी 81 गुळेली ग्रामपंचायतीसाठी 120 होंडा ग्रामपंचायतीसाठी 302 मावशी ग्रामपंचायतीसाठी 91 मोर्ले ग्रामपंचायतीसाठी 205 नगरगाव ग्रामपंचायतीसाठी 166 पिसुर्ले पंचायतीसाठी 178 पर्ये ग्रामपंचायतीसाठी 319 केरी ग्रामपंचायतीसाठी 237 सावर्डे ग्रामपंचायतीसाठी 190 प्रस्तावांना मंजुरी मिळालेली आहे. यामुळे येणाऱया काळात शौचालय उभारणीच्या कामाला लवकरच प्रारंभ होणार असल्याचे समजते. त्याचबरोबर सरकार दुसऱया टप्प्यातील अर्जाना मंजुरी देण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ केला असून ज्यांची नावे  शौचालय सुविधा यादीमध्ये  समाविष्ट करण्यात आलेली आहे त्यांनी कागदपत्रे सोपस्कार लवकरात लवकर पूर्ण करावा जेणेकरून त्यांना या मोफत शौचालय योजनेचा फायदा मिळणार आहे.

 दरम्यान गेल्या अनेक वर्षापासून सत्तरी तालुक्मयांमध्ये शौचालय योजनेचा बोजवारा उडाल्याचे चित्र स्पष्टपणे पहावयास मिळाले होते. यामुळे अनेक गावांमध्ये उघडय़ावर शौचालय करीत असल्यामुळे रोगराईची भीतीही व्यक्त करण्यात आली होती. नगरगाव पंचायत क्षेत्रांमधील शेळपे या ठिकाणी अशाच प्रकारे उघडय़ावर शौचालय करण्याच्या प्रयत्नातून ई काँलाय या जंतूंमुळे नागरिकांना अनेक प्रकारच्या आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागले होते. याची गंभीर दखल घेत सरकारने राज्यामध्ये शौचालय योजना अमलात आणण्यास संदर्भात महत्त्वाचे पाऊल उचलले व त्या संदर्भाची अंमलबजावणी सध्या प्रचंड प्रमाणात करण्यात येत असल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Related Stories

पंढरपूरला कसा पोहोचलो ते आठवत नाही

Amit Kulkarni

मनमोहनसिंग यांच्यावरील आरोप भाजपने सिद्ध करावेत

Amit Kulkarni

गोवा डेअरीला खास आमसभेसंबंधी सहकार निबंधकाची नोटीस

Amit Kulkarni

उद्योगांमध्ये 12 तास काम करण्यासाठी सरकारी अनुमती

Amit Kulkarni

गोवा डेअरीला आर्थिक वर्षात रू 8 कोटीची नुकसानी

Omkar B

पालयेतील पठारावर रंगतात विदेशांच्या पाटर्य़ा

Omkar B
error: Content is protected !!