तरुण भारत

जगभरात 51.94 लाख कोरोनाबाधित

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

जगभरात आतापर्यंत 51 लाख 94 हजार 210 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 3 लाख 34 हजार 621 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. 20 लाख 80 हजार 966 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही 27 लाख 78 हजार 623 ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 45 हजार 620 केसेस गंभीर आहेत. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. 

Advertisements

अमेरिकेत कोरोना संक्रमणाचे आणि बळींचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 16 लाख 20 हजार 902 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 96 हजार 354 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर रशियात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. रशियात 3 लाख 17 हजार 554 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 3 हजार 099 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

अमेरिकेनंतर इंग्लंडमध्ये कोरोनाबळींचा आकडा सर्वाधिक आहे. इंग्लंडमध्ये 2 लाख 50 हजार 908 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 36 हजार 042 जण दगावले आहेत. भारतातही 1 लाख 18 हजार 226 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 3584 रुग्ण दगावले आहेत. 48 हजार 553 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, 66 हजार 089 ॲक्टिव्ह केसेस आहेत.

Related Stories

येडियुरप्पा यांचे पंतप्रधानांना दरमहा १.५ कोटी लसीचे डोस देण्याचे आवाहन

Abhijeet Shinde

ममता बॅनर्जींचा भाजपवर हल्लाबोल

Patil_p

मरकज : इंडोनेशियातून आलेल्या धर्मगुरूंसह 12 जणांवर गुन्हा

prashant_c

इराणला घाई अण्वस्त्र कराराच्या पुनर्स्थापनेची

Patil_p

लवकरच युक्रेनवर हल्ला करू शकतो रशिया

Patil_p

अफगाण-तालिबान शांतता चर्चेला प्रारंभ

Patil_p
error: Content is protected !!