तरुण भारत

डॉ. हर्षवर्धन आज स्वीकारणार WHO च्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्रे

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आज जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. सध्या डब्ल्यूएचओच्या 34 सदस्यीय कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष असलेल्या जपानच्या डॉ. हिरोकी नाकातानी त्यांच्याकडून हर्षवर्धन पदभार स्वीकारतील. 

Advertisements

WHO च्या कार्यकारी मंडळावर पुढील 3 वर्ष भारताची निवड करण्याचा निर्णय मागील वर्षी घेण्यात आला होता. त्यानुसार डॉ. हर्षवर्धन यांची भारताचा प्रतिनिधी म्हणून निवड झाली असून, या प्रस्तावावर 194 देशांच्या जागतिक आरोग्य असेंब्लीने स्वाक्षऱ्या केल्या आहेत. 

औपचारिकता म्हणून हर्षवर्धन आज WHO च्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. हे अध्यक्षपद प्रादेशिक गटांमध्ये एका वर्षासाठी आळीपाळीने देण्यात येते. भारताचा प्रतिनिधी आजपासून पहिल्या वर्षासाठी मंडळाचा अध्यक्ष असणार आहे. हे पद नसून केवळ कार्यकारी मंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविण्यासाठी आहे. कार्यकारी मंडळाचे मुख्य कार्य म्हणजे हेल्थ असेंब्लीच्या निर्णय आणि निर्णयांसाठी योग्य सल्ला देणे आहे. 

Related Stories

जलसंपदा मंत्री जयंत पाटील कोरोना पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

सीमेवर पाकिस्तानकडून कुरापती सुरूच, एक जवान शहीद

Rohan_P

अर्जेंटीनाचं २८ वर्षांनंतर स्वप्न पूर्ण; गतविजेत्या ब्राझीलला चारली धूळ

Abhijeet Shinde

10 लाखाची नोट चलनात आणणारा व्हेनेझुएला पहिला देश

Patil_p

अन्यथा.. दारूची दुकानेही बंद करावी लागतील : आरोग्यमंत्री

Abhijeet Shinde

रोजगारनिर्मितीचा गाडा हळूहळू रुळावर

Patil_p
error: Content is protected !!