तरुण भारत

एनटीपीसी-ओएनजीसी यांच्यात करार

अक्षय ऊर्जा व्यवसायांच्या उभारणीसाठी कंपन्या एकत्र 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सार्वजनिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणारी एनटीपीसी लिमिटेड आणि ऑईल ऍण्ड गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ओएनजीसी) यांनी देशामध्ये वेगाने उभारत असणाऱया अक्षय ऊर्जा (रिन्यूएबल एनर्जी) व्यवसायांसोबत एकत्र येत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपन्या एकत्रितपणे उपक्रम राबवण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले आहे.

एनटीपीसी आणि ओएनजीसी या अक्षय ऊर्जा व्यवसायांशी संबंधीत असणाऱया कंपन्यांची स्थापना करणार असून याच्यासाठी दोन्ही कंपन्यांमध्ये करार करण्यात आला आहे. सदर कराराप्रसंगी एनटीपीसीचे संचालक ए.के.गुप्ता आणि ओएनजीसीचे संचालक आणि बिझनेस डेव्हलपमेन्टचे सुभाष कुमार उपस्थित होते.

सादर करण्यात आलेल्या कराराच्या आधारे एनटीपीसी आणि ओएनजीसी भारत आणि विदेशामध्ये हवा आणि अन्य नवीन उपक्रमाच्या आधारे ऊर्जा परियोजनांची स्थापना करणार असल्याचे सांगितले आहे. एनटीपीसीकडून 920 मेगावॅट वीज निर्मितीची योजना आणि निर्माणाधीन जवळपास 2300 मेगावॅटची आरआय परियोजना आखण्यात येणार आहे. रिन्यूएबल ऊर्जा क्षमतेचा विस्तार वेगाने करण्यावर भर देण्यात येणार आहे.

वीज निर्मितीचे एनटीपीसीचे ध्येय

दोन्ही कंपन्या हवा आणि विदेशी रिन्यूएबल एनर्जी परियोजनेच्या क्षेत्रांमध्ये विस्तार करण्यासाठी एनटीपीसीकडून 2023 पर्यंत 32 गीगावॅट वीज उत्पादनाचे ध्येय निश्चित केले असल्याचे स्पष्ट केले आहे.

ओएनजीसीचे ध्येय

दुसऱया बाजूला ओएनजीसीकडे 176 मेगावॅट इतक्मया क्षमतेचा अक्षय ऊर्जा प्रकल्प आहे. यामध्ये 153 मेगावॅट पवन ऊर्जा आणि 23 मेगावॅट सौर ऊर्जेचा समावेश आहे. आगामी 2040 पर्यंत कंपनी 10 गीगावॅट अक्षय ऊर्जेची जोडणी करणार असल्याचे म्हटले आहे.

Related Stories

कोरोनामुळे शेअर बाजारात मोठी घसरण

tarunbharat

वर्षाच्या अंतिम दिवशी सेन्सेक्स-निफ्टी स्थिरावले

Patil_p

पार्ले ऍग्रोकडून 10 हजार कोटीच्या उलाढालीचे ध्येय

Omkar B

चालू आर्थिक वर्षात देशाचा जीडीपी घसरणार ?

Patil_p

सप्ताहाच्या अंतिम दिवशी तेजीची झुळूक

Patil_p

‘जिओ प्लॉटफॉर्मस’ नंतर आता ‘रिलायन्स रिटेल’!

Omkar B
error: Content is protected !!