तरुण भारत

कोल्हापूर : औरवाडमधील 12 वर्षीय मुलीला कोरोनाची लागण

प्रतिनिधी/कुरुंदवाड

शिरोळ तालुक्यातील औरवाड येथे कोरोनाचा एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दोन दिवसापूर्वी कुरुंदवाड तेरवाड अकिवाट घोसरवाड कोरोनाचा रुग्ण आढळल्याने या परिसरात मोठी घबराट निर्माण झाली होती. तर आज, शुक्रवारी सायंकाळी औरवाड ता. शिरोळ येथील एका 12 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले. औरवाड येथे चार दिवसांपूर्वीच ती युवती आली होती.

औरवाड येथे कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण पडल्याने प्रशासन खडबडून जागे झाले. आरोग्य विभाग पोलिस प्रशासन तात्काळ औरवाडात दाखल झाले, त्यांनी संबंधित रुग्णाला पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर येथे पाठवले असून तिच्या अन्य कुटुंबीयांच्या संपर्कात आरोग्य विभागातील लोक संपर्क ठेवून आहेत.

Related Stories

शाहूपुरी पोलिसांकडून मोबाईल, दुचाकी चोरटयांची टोळी अटक

triratna

गेलास का इलाही हलवून काळजांना

Patil_p

महाराष्ट्र : मंगळवारी 6,365 रुग्ण कोरोनामुक्त!

pradnya p

भाजपाचे उमेदवार संग्राम देशमुखांचा शिरोळमध्ये युवा संवाद व पदवीधर मतदार गाठीभेटी संपर्क दौरा

triratna

आनेवाडीच्या जिल्हा बँकेत सोशल डिस्टनसचा फज्जा

Patil_p

संचारबंदीमध्ये शाहूपुरीत पाण्याचा ठणठणाट

Patil_p
error: Content is protected !!