तरुण भारत

सायबर सुरक्षा क्षेत्रातील कंपन्यांना लवकरच अच्छे दिन

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशातील सायबर सुरक्षा क्षेत्रात सेवा देत असणाऱया कंपन्यांची उलाढाल आगामी 2025 पर्यंत तीन पट वधारुन 13.6 अब्ज डॉलरच्या घरात पोहोचण्याचा अंदाज आहे. या बाजाराचा प्रति वर्षाला 20 ते 22 टक्क्मयांनी विस्तार होण्याचे संकेत आहेत. सध्याच्या काळात या बाजाराची उलाढाल 4.39 अब्ज डॉलरवर आहे. विशेष गोष्ट म्हणजे या व्यवसायातील उत्पन्नाची कमाई करण्याचा 80 टक्के वाटा हा जागतिक बाजारांचा राहिलेला आहे.

व्यापारी वर्ष 2023 च्या शेवटापर्यंत सायबर सुरक्षा बाजार वाढून 9.3 अब्ज डॉलरच्या घरात पोहोचणार असल्याचा दावा डाटा सिक्मयुरिटी कौन्सील ऑफ इंडियाचे (डीएससीआय)मुख्य कार्यकारी अधिकारी रमा वेदाश्री यांनी केला आहे. त्या सायबर सिक्मयुरिटी सर्व्हिसेस लँडस्केपच्या अहवालाचे सादरीकरण करताना बोलत होत्या.

जगभरात सायबर सुरक्षा सेवा देणाऱया कंपन्यांची एकूण कमाई 2019-20मध्ये 64 अब्ज डॉलरवर राहिली होती. हाच आकडा 2022 पर्यंत वाढून 89 अब्ज डॉलरपर्यंत जाईल आणि 2025 च्या कालावधीपर्यंत हीच उलाढाल वधारत जात  116 अब्ज डॉलरच्या घरात पोहोचणार असल्याचा अंदाज यावेळी व्यक्त केला आहे.  

Related Stories

सॅमसंगचा फोल्डेबल फोन झाला स्वस्त

Patil_p

चिनी मोबाईल्सच्या वर्चस्वाला फटका

Omkar B

फोन, ऍक्सेसरीजवरील आयात कर वाढणार

Patil_p

केकेआरकडून रिलायन्स रिटेलला मिळाला धनादेश

Patil_p

रिलायन्स ‘स्मार्ट वीज मीटर’ व्यवसायात?

Omkar B

आर्थिक,आयटी-वाहन कंपन्यांमुळे बाजारात उत्साह

Omkar B
error: Content is protected !!