तरुण भारत

संदेश झिंगनची जर्सी निवृत्त करणार

वृत्तसंस्था/ कोची

केरळ ब्लास्टर्स संघातील महत्वाचा फुटबॉलपटू संदेश झिंगन याची  21 क्रमांकाची जर्सी लवकरच निवृत्त करण्याचा निर्णय या क्लबचे मालक निखील भारद्वाज यांनी  घेतला आहे.

Advertisements

आपल्या वयाच्या 20 व्या वर्षी संदेश झिंगनने केरळ ब्लास्टर्स फुटबॉल क्लबमध्ये पदार्पण केले होते. गेल्या पाच वर्षांच्या फुटबॉल हंगामात संदेशने  76 सामन्यात केरळ ब्लास्टर्सचे प्रतिनिधीत्व करताना आपल्या कामगिरीत सातत्य राखले. संदेशच्या  सहभागामुळे केरळ ब्लास्टर्स क्लबचा निश्चितच दर्जा आणि विकास झाल्याने संदेशचे या क्लबमधील स्थान महत्वाचे ठरले आहे. या क्लबचे प्रतिनिधीत्व करताना संदेशच्या  फुटबॉल विकासामध्ये चांगलीच सुधारणा  झाली आहे. या क्लबकडून खेळताना संदेश 21 क्रमांकाच्या जर्सीचा वापर करीत असे. क्लबच्या विकास प्रक्रियेमध्ये संदेशचा वाटा महत्वाचा असल्याचे भारद्वाज यांनी सांगितले. केरळ ब्लास्टर्स क्लब सोडल्यानंतर आता संदेशला कतार, संयुक्त अरब अमिरात आणि काही ऑस्टेलियन फुटबॉल क्लबकडून ऑफर्स येत आहेत. गेल्यावर्षीच्या फुटबॉल हंगामात केरळ ब्लास्टर्स संघाकडून खेळणारा सॅम्युअल लालमुआनपुईआ आता ओडिशा एफसी संघात दाखल झाला आहे. संदेश झिंगनने केरळ ब्लास्टर्स क्लबला शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Stories

भारताचे दोन युवा संघ खेळविण्याची बीसीसीआयची योजना

Patil_p

बेन स्टोक्सचा डरहॅमशी आणखी 3 वर्षांचा करार

Patil_p

आयपीएलसाठी 18 फेब्रुवारीला खेळाडूंचा लिलाव

Patil_p

दिल्ली कॅपिटल्समुळे खेळ बहरला – सॅम बिलिंग्ज

Patil_p

उमेश यादव, सिराज यांची प्रभावी गोलंदाजी

Amit Kulkarni

अचंता शरथ कमलची आगेकूच

Patil_p
error: Content is protected !!