तरुण भारत

अक्कलकोटमधील मृत व्यापाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / अक्कलकोट

अक्कलकोट मधील फरशी व्यापारी यांचा कोरोनामुळे शुक्रवारी मृत्यू झाला . फरशी व्यवसायानिमित्त मैंदर्गी येथे येणे-जाणे असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मयत व्यापारी ज्या परिसरात राहत होते तो परिसर, त्यामूळे मृत व्यक्ती ज्या भागात जात होते. तो परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी ज्योती पाटील यांनी दिली. त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना कोरोना चाचणीसाठी ताब्यात घेण्यात आले असल्याची माहितीही प्रांताधिकारी ज्योती पाटील यांनी दिली.
सोलापूर शेजारी असलेल्या अक्कलकोट शहरातही आज कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. अक्कलकोट शहरातील मधला मारुती परिसरातील ४६ वर्षीय व्यापाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर ते कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले असल्याची माहिती प्रांताधिकारी ज्योती पाटील यांनी दिली.

Advertisements

निमोनियाचा त्रास होत असल्याने हे व्यापारी अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी गेले होते. तेथील डॉक्टरांनी एक्स-रे काढण्याचा त्यांना सल्ला दिला. पुढील उपचारासाठी त्यांना सोलापुरात पाठविण्यात आले. सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्यानंतर त्या व्यापाऱ्याचा 21 मे रोजी मृत्यू झाला आहे. त्यांना गेल्या वर्षी देखील निमोनिया झाल्याचे समजते. त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल शुक्रवारी रात्री उशिरा प्राप्त झाला असून तो अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहितीही प्रांताधिकारी ज्योती पाटील यांनी दिली. मृत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना कोरोना चाचणीसाठी ताब्यात घेण्यात आले असल्याची माहितीही प्रांताधिकारी ज्योती पाटील यांनी दिली.

अक्कलकोटमधील मृत व्यापाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्हतरुण भारत प्रतिनिधी / अक्कलकोट अक्कलकोट मधील फरशी व्यापारी…

Posted by Tarun Bharat Daily on Saturday, May 23, 2020

Related Stories

नगरसेवकांच्या इशाऱयानंतर रस्त्याच्या कामाला आला वेग

Patil_p

टाळेबंदीनंतर प्रथमच पंढरपूरची कार्तिकी यात्रा भरणार

Abhijeet Shinde

अत्यवस्थ रूग्णांना सर्वप्रथम दाखल करावे – ग्रामविकास मंत्री मुश्रीफ

Abhijeet Shinde

मार्केटयार्ड परिसरात बेशिस्त पार्किंगवर कारवाई

Patil_p

कोल्हापूर जिल्हा परिषदेतील दोन अधिकारी कोरोना बाधित

Abhijeet Shinde

कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या शून्यावर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!