तरुण भारत

बेळगाववरून बेंगळूरला रेल्वे रवाना

प्रतिनिधी/ बेळगाव

लॉकडाऊननंतर सुरू झालेली पहिली पॅसेंजर सुपरफास्ट रेल्वे बेंगळूरवरून बेळगावला शुक्रवारी आली. हीच रेल्वे शनिवारी सकाळी 8 वा. बेंगळूरला रवाना झाली. तब्बल 60 दिवसांनी बेळगावमधील प्रवाशांना बेंगळूरला रेल्वेने जाता आले. बेळगाव रेल्वेस्थानकातून 99 प्रवासी बेंगळूरला रवाना झाले.

Advertisements

शनिवारी सकाळी प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग करूनच रेल्वेस्थानकात प्रवेश देण्यात येत होता. प्रवाशांना त्यांच्या सीट क्रमांकानुसार बसविण्यात आले. ही रेल्वे पूर्णपणे सिटींग असल्यामुळे एक सीट सोडून एका सीटवर प्रवाशांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. बेंगळूरला रेल्वे सुरू केल्यामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त करण्यात येत होते. अनेकजण बेंगळूरमध्ये अडकून पडले होते. त्यांना आपापल्या गावी जाण्यासाठी ही रेल्वे उपयुक्त ठरत आहे.

गरज प्रवाशांच्या प्रतिसादाची

प्रवाशांच्या सोयीखातर रेल्वे विभागाने ही रेल्वे सुरू केली आहे. परंतु पहिल्या फेरीला तितकासा प्रतिसाद मिळालेला नसल्याचे दिसून येत आहे. खासगी वाहनांपेक्षा अत्यंत कमी दरात व सुरक्षेचा हा प्रवास असल्याने या रेल्वेला प्रतिसाद देणे गरजेचे आहे. अनेक जण अद्यापही प्रवास करण्यास घाबरत आहेत. परंतु रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षिततेची पूर्णपणे दक्षता घेतली असल्याचे दिसून येत आहे. 

Related Stories

महापालिका वॉर्डनिहाय अंतिम आरक्षण जाहीर

Amit Kulkarni

नरेगातून अलतगा येथे 14 लाखांच्या कामांना प्रारंभ

Omkar B

गौड सारस्वत ब्राह्मण समाजाची वार्षिकसभा खेळीमेळीत

Amit Kulkarni

37 हजार लाभार्थी घरांच्या स्वप्नात…!

Omkar B

टीईटी 4 ऑक्टोबर रोजी होणार

Patil_p

लोकमान्य सोसायटीतर्फे ग्राहकांसाठी 10 टक्के व्याजदर मिळविण्याची अभूतपूर्व संधी

Omkar B
error: Content is protected !!