तरुण भारत

दुचाकीस्वारांवर पुन्हा पोलीस कारवाई हाती

सावंतवाडी

जिल्हय़ात लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर बाजारपेठा सुरू करण्यात आल्या. मात्र, बाजारात दुचाकीवरून डबलसीट फिरणाऱयांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या चार दिवसात सावंतवाडी पोलिसांनी 80 दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई केली. मात्र, सायंकाळी सातनंतर रात्रीपर्यंत बिनधास्तपणे डबलसीट दुचाकीस्वार फिरत आहेत.

Advertisements

जिल्हाधिकाऱयांच्या आदेशान्वये लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली. बाजारपेठा सकाळी नऊ ते संध्याकाळी पाचपर्यंत खुल्या ठेवण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे ग्राहकांची गर्दी वाढू लागली. बाजारात येणाऱया ग्राहकांनी मास्क न वापरल्यास दोनशे रुपये दंडात्मक कारवाईचे आदेश केले आहेत. डबलसीट दुचाकीस्वार आढळल्यास कारवाई करण्याचे फर्मान काढले आहे. मात्र, पती-पत्नी असल्यास शिथिलता दिली आहे. असे असताना दुचाकीस्वार सर्रासपणे फिरत आहेत. त्यामुळे पोलिसांनी दंडात्मक कारवाई हाती घेतली आहे. आहे. दररोज 20 ते 25 डबलसीट दुचाकीस्वार पोलिसांना सापडतात. शनिवारी सायंकाळी सातनंतर कारवाई तीव्र करण्यात आली. सावंतवाडी पोलिसांनी दोन अधिकाऱयांसह दहा कर्मचारी, वाहतूक पोलीस व पंधरा होमगार्ड बंदोबस्तासाठी ठेवले आहेत.

Related Stories

‘लर्न फ्रॉम होम’ला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

NIKHIL_N

आंग्रिया बँक भारतातील पहिले सागरी संरक्षित क्षेत्र

NIKHIL_N

जिह्यात लसीकरणाची आज रंगीत तालीम

Patil_p

सहृदयी भावूक निरोप समारंभ संपन्न

Rohan_P

दाऊदच्या दुमजली बंगल्यात भरणार सनातनची पाठशाळा

Patil_p

106 वाहनांचे रजिस्ट्रेशन अखेर रद्द

NIKHIL_N
error: Content is protected !!