तरुण भारत

गोव्यात देशी पर्यटन शक्य

राज्यपाल सत्यपाल मलीक यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी / पणजी

Advertisements

गोवा कोरोनामुक्त झाल्यानंतर पर्यटनाची समस्या उद्भवणार नाही. त्यामुळे देशी पर्यटक गोव्यात येतील. विदेशी पर्यटक येण्यास थोडा काळ जाईल. पण विदेशी पर्यटकही येतील. पर्यटन उद्योगाचे दीर्घकाळ नुकसान होणार नाही, असे गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलीक यांनी स्पष्ट केले आहे.

गोव्याचा पर्यटन उद्योग लवकरच सुधारणार आहे. कोरोनाचे संकट दीर्घकाळ रहाणार नाही. त्यामुळे कोरोनाचा धोका जास्त काळ रहाणार नाही. खाण व्यवसाय सुरू होणे गोव्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर कृषी क्षेत्रात भर देणेही गरजेचे आहे. सरकारने त्याकडे लक्ष द्यायला हवे. बेरोजगारी ही गोव्याची समस्या नाही. खाणबंदी ही समस्या आहे. खाण व्यवसाय सुरू झाल्यास राज्याचा 3500 कोटीचा महसूल प्राप्त होणार आहे. हा महसूल मिळाल्यास राज्याच्या अर्थव्यवस्थेला उभारी मिळणार आहे. याव्यतिरीक्त राज्यातील लोकाना कृषी क्षेत्राकडे वळविण्याचाही सरकारचा प्रयत्न आहे. कृषी व्यवसायाला गोव्यात खूप मोठा वाव आहे. त्याचबरोबर तो एक मोठा आर्थिक उपक्रमही ठरू शकतो. कोरोना व्हायरसच्या काळात औद्योगिक क्षेत्रावर फार मोठा परिणाम झाला नाही. लॉकडाऊनच्या काळात उद्योगांनी बाहेरच्या कामगाराना सर्व सुविधा पुरविल्या व ठेवून घेतले. लोकांनी मार्गदर्शकतत्त्वाचे पालन केले, तसेच सामाजिक दुरी बाळगली जेणेकरून कोरोनाचा फैलाव रोखला गेला याबद्दल राज्यपालांनी लोकांना धन्यवाद दिले.

Related Stories

काँग्रेस ओबीसी शाखा अध्यक्षपदी संदेश खोर्जुवेकर

Amit Kulkarni

तिसवाडीत आज, उद्या मर्यादित पाणीपुरवठा

Amit Kulkarni

सामाजिक, आर्थिक क्षेत्रात युवा नेतृत्वाची गरज

Patil_p

मडगावातील दुहेरी खून प्रकरण सत्र न्याया.त वर्ग करण्याचा आदेश

Patil_p

जीसीईटी परीक्षा आता 27, 28 जुलै रोजी

Amit Kulkarni

‘नोकरी‘ हा शिक्षणाचा अंतिम उद्देश नसावा : श्रीपाद नाईक

Amit Kulkarni
error: Content is protected !!