तरुण भारत

कणकवलीतील बहुचर्चित नाल्याची दुरुस्ती अखेर सुरू

वार्ताहर / कणकवली:

गेली दोन वर्षाहून अधिक काळ येथील ऍड. उमेश सावंत यांच्या घराशेजारील नाल्यात असलेली काँक्रिटची भिंत अखेर शनिवारी काढण्यात आली. चार दिवसापूर्वी न. पं. च्या नगरसेवकांनी या कामाची पाहणी करीत ठेकेदार कंपनीला सूचना दिल्या होत्या. त्यानंतर तातडीने हे काम मार्गी लावण्यात आले. ही भिंत हटवल्यामुळे नाल्यात साचून राहणारे पाणी निचरा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Advertisements

शहरातील महामार्गालगत डीपी रोडपासून ते छ. शिवाजी महाराज चौक ते सारस्वत बँकेपर्यंत मर्क्युरी लाईट सुरू करण्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. अपूर्णावस्थेतील सर्व्हीस रोडचेही काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. पटवर्धन चौकात बीएसएनएलचा डीपी बॉक्स हटविण्यात आला नसल्याने या भागातील सर्व्हिस रोडचे कामही काम शिल्लक राहिले आहे. संदेश पारकर यांच्या मागणीनंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी दोन दिवसांपूर्वी हायवेच्या अधिकारी व ठेकेदाराची बैठक घेत त्यांना सूचना दिल्यानंतर शहरातील कामे हाती घेण्यात आली आहेत. शनिवारी येथील ऍड. सावंत घराशेजारील नाल्याच्या सफाईच्या कामाची नगरसेवक बंडू हर्णे यांनी पाहणी करीत उर्वरित कामे पावसाळ्य़ापूर्वी पूर्ण करण्याची मागणी केली आहे.

Related Stories

रत्नागिरी : राजापूर शहराला पुराचा वेढा, एकाचा बुडून मृत्यू

triratna

लांजा-कणगवलीत बेपत्ता प्रौढाचा घातपात?

Patil_p

जिल्हय़ातील सर्व धरणांवर पहारेकरी, चौकीदार

Patil_p

सांस्कृतिक केंद्र दर्शनी भागात पडझड!

Patil_p

कोकणवासीयांचा आवाज विधीमंडळात मांडणार

Patil_p

सावंतवाडीत विज्ञान प्रदर्शन

NIKHIL_N
error: Content is protected !!