तरुण भारत

क्वारंटाईन चाकरमान्यांकडून कांदळगावात शाळेची स्वच्छता

वार्ताहर / मालवण:

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतून आलेल्या चाकरमान्यांना प्राथमिक शाळांमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. ओझर विद्यामंदिर, कांदळगाव येथे क्वारंटाईन करण्यात आलेले चाकरमान्यांनी स्वस्थ बसून न राहता शाळेचा परिसर स्वच्छ केला आहे. या चाकरमान्यांनी शाळेविषयी असणारी कृतज्ञता आपल्या कृतीतून दाखवून दिली आहे. चाकरमान्यांनी शाळेचा सर्व परिसर श्रमदानाने स्वच्छ केला आहे. शाळेच्या बाजूला असणाऱया झाडांसाठी खळी केली आहेत. त्यामुळे सध्या झाडांना योग्य पद्धतीने पाणी मिळत आहे. चाकरमान्यांनी शाळा स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे. कांदळगाव येथील चाकरमान्यांनी राबविलेल्या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Advertisements

Related Stories

तर जनताच तुमचे सरकार राजापूरच्या समुद्रात बुडवेल

Patil_p

पॉलिटेक्निक, डी.फार्मसी प्रवेशाला मुदतवाढ

NIKHIL_N

घटनास्थळी सापडले दत्तारामचे घडय़ाळ

NIKHIL_N

नागरिक स्वतःहून समोर येत नसल्याने कारोना चाचण्यांचे प्रमाण घटले

Patil_p

कॉलेज प्रवेशाला विद्यार्थ्यांचा थंडा प्रतिसाद

Patil_p

रत्नागिरी : रोटरीच्या अनुष्का म्हातलेची आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी निवड

triratna
error: Content is protected !!