तरुण भारत

कोल्हापुरात आणखी 32 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पोहोचली 317 वर

प्रतिनिधी/कोल्हापूर

Advertisements

कोल्हापूर जिल्हयातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आणखी 32 ने वाढ झाली असून आजअखेर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 317 वर पोहोचली आहे. तसेच आजअखेर 14 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाले असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

 10 पर्यंत 8 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ

रविवारी सकाळी 10 वाजेपर्यंत आणखी 8 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाल्याने जिह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकुण संख्या 286 वर पोहोचली. यामध्ये शाहूवाडीतील 6 तर गगनबावडा तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश होता. तर 643 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. शाहूवाडीत सर्वाधिक 95 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या आढळले आहेत. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बी.सी.केम्पीपाटील यांनी दिली.

सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत आढळले 32 रुग्ण पॉझिटिव्ह

सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत आणखी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडल्याने रविवारच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 32 वर पोहोचली. तर आजअखेर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 317 वर पोहचली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

आजअखेर 12 हजार 772 रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह

आजअखेर जिल्हयातील कोरोना सदृश्य लक्षणे असलेल्या संशयित सुमारे 19 हजार 392 रुग्णांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. यापैकी 12 हजार 772 रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह तर 317 पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. तसेच 6 हजार 241 रुग्णांचे अहवाल अप्राप्त, 14 रुग्णांचे रिपीट सॅम्पल तर 48 रुग्णांचे रिजेक्ट करण्यात आले आहेत. तसेच खासगी लॅब अंतर्गत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या सर्व 59 रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

14 कोरोना पॉझिटिव्ह झाले बरे

जिल्हयातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी आजअखेर 14 रुग्ण बरे झाले आहेत. त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. तर 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सीपीआर, आयजीएमसह विविध खासगी रुग्णालयांमध्ये सध्या 301 रुग्ण उपचारासाठी दाखल असून 4 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.

256 रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत

कोरोना सदृश्य लक्षणे असलेल्या संशयित सुमारे 1 हजार 48  रुग्णांचे रविवारी स्क्रिनिंग व तपासणी करण्यात आली. यापैकी 256 रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. आजअखेर देशांतर्गत 1 हजार 83 संशयित रुग्ण विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. आजअखेर जिल्हयात आलेल्या प्रवासी नागरिकांची संख्या 86 हजार 548 इतकी असून 84 हजार 628 नागरिकांनी 14 दिवसांचा कालावधी पूर्ण करून क्वारंटाईनमुक्त झाले आहेत. तर 1 हजार 556 नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

Related Stories

काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Rohan_P

मेहबूबा मुफ्ती यांच्या नजरकैदेत तीन महिन्यांची वाढ

Rohan_P

हरयाणात डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांचे वेतन दुप्पट

prashant_c

परिस्थिती हाताबाहेर, काबुल विमानतळावर लाखोंची गर्दी

datta jadhav

गांधीनगर कोविड तपासणी केंद्रात नागरिकांची गैरसोय

Abhijeet Shinde

नरतवडेत एक युवक कोरोना पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde
error: Content is protected !!