तरुण भारत

क्वारंटाईनवरुन आंबेड खुर्द गावात मारामारी, 13 जणांवर गुन्हा दाखल

वार्ताहर/ संगमेश्वर

कोरोनाबाबत योग्य ती दक्षता व क्वारंटाईनच्या वादातून संगमेश्वर जवळच्या आंबेडखुर्द गावातील दोन गटात झालेल्या वादाचे पर्यवसान मारामारीत झाले असून दोन गटातील 13 जणांवर संगमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे. दोन्ही गटाने पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्याद दिली आहे.

याबाबत दिनेश बापु कांबळे यांनी दिलेल्या फियार्दीत असे म्हटले आहे की, ते व त्याचे वाडीतील ग्रामस्थांना ग्रामपंचायतीच्यामार्फत कोरोना संसर्गजन्य रोगाच्या अनुषंगाने वाडी वाडीमध्ये नेमण्यात आले आहे. दिनेश व ग्रामस्थ आंबेडखुर्द बौध्दवाडीतील सागर कांबळे हा मुंबईतून आलेला असल्याने त्याच्या घरात जावून कोरोना विषयक जागृती आणि क्वारंटाईन विषयी माहिती देवून आले त्यावेळी सुरेंद कांबळे यांने तू आमच्या घरी का गेलास आमची आणि बौध्दवाडीचा काहीही संबंध नाही असे सांगितले व शिवीगाळ यावरुन पोलिस पाटील यांना दिनेश कांबळे हे भेटण्यासाठी जात असताना सागर कांबळे,नितीन कांबळे,तन्मय कांबळे,कैलास कांबळे,कुणाल कांबळे हे राहणार आंबेड खुर्द हे सर्व काठी घेवून आले. याचवेळी ही वाद सोडविण्यासाठी आलेल्या दिनेश कांबळे यांचा भाव दिपक कांबळे याला काठीने मारहाण केली व शिवीगाळ केली आहे. दिनेश कांबळे यांच्या फिर्यादीवरुन सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर नितिन कांबळे यांने दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, चुलत भाऊ सागर हा मुंबईतून आला असल्याने त्याला साडवली येथून होम क्वारंटाईन करण्यासाठी घरी आणले. त्याला वाडीत सोडल्यानंतर दिनेश कांबळे,रुपेश कांबळे,अतुल कांबळे यांनी सागर यांच्या घरी जावून चुलत बहिण शिल्पा हीस सागर घेवून आला आहे काय अशी विचारणा केली. सागर घरी कसा काय आला आहे त्याची कागदपत्रे कोठे आहेत अशी विचारणा केली. त्याबाबत गावचे सरपंच,पोलिस पाटील,यांना माहिती दिलेली आहे त्यांना काय ते विचार असे सांगितले. यावर त्यांना राग येवून त्या रागाच्या भरात सदरचा प्रकार विचारण्यासाठी गेले असता व पुढील व्यक्तींच्या हातातील बांबू काढून घेत असताना चुकून त्याला लागल्याचे म्हटले आहे. तसेच

गावातील दोन जणांच्या फिर्यादीवरुन दोन्ही गटातील तेरा जणांवर संगमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

विद्यार्थ्यांच्या दप्तरात आता एकच पुस्तक

NIKHIL_N

रत्नागिरी बाजार समितीत आंबा खरेदी-विक्रीचा श्रीगणेशा

Patil_p

चाकरमानी आगमनाचे धोरण प्रशासनाने निश्चित करावे!

NIKHIL_N

सहकारी संस्था निवडणूक पहिला टप्पा सोमवारपासून

NIKHIL_N

ओरोसला सात परप्रांतीय ताब्यात

NIKHIL_N

चिपळुणात एस.टी.चालकाचे उपोषण

Patil_p
error: Content is protected !!