तरुण भारत

उचगाव भागात उरकली 22 लग्ने

अनावश्यक खर्चाला फाटा : नियमांचे पालन : वाटाण्याच्या अक्षता

एन. ओ. चौगले/ उचगाव

Advertisements

उचगाव परिसरातील गावांमधून रविवारी सकाळी नऊ वाजून एक मिनिटाच्या मुहूर्तावर 22 लग्ने लागली. मात्र, लॉकडाऊनमुळे या लग्नांचा सुगावा बाजूच्या गल्लीला लागला नाही. या वर्षीच्या लग्न सराईतील सर्वाधिक लग्ने लावण्याचा रविवारचा दिवस ठरला.

लॉकडाऊन काळात लग्न समारंभांवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. यामुळे मार्च, एप्रिल व मे या महिन्यांतील काही लग्न समारंभ पुढे ढकलण्यात आले. मात्र, लॉकडाऊनमध्ये थोडी शिथिलता दिल्यानंतर नियमांचे पालन करत लग्ने करण्यात आली. काही ठिकाणी नियम धाब्यावर बसवून लग्न समारंभ पार पाडण्यात आल्याचे चित्र दिसून येत होते.

सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने दिलेल्या मार्गसुचीप्रमाणे बरीच लग्ने झाली. पण काही ठिकाणी नियमांना हरताळ फासण्यात आला. अनेक लग्न समारंभात सॅनिटायझरचा वापर तसेच मास्क व सामाजिक अंतराचा अवलंब करण्यात आल्याचे पाहावयास मिळत होते. मात्र, काही समारंभात थर्मल स्क्रिनिंग नाही. नोडल अधिकाऱयांची अनुपस्थिती तर उपस्थितांची संख्या शे-दिडशेच्या आसपास पोहचल्याचे पाहावयास मिळले.

अवास्तव खर्चाला फाटा

लग्न समारंभ म्हटलं की अफाट खर्च ठरलेला. निमंत्रण पत्रिका, दागिने, जेवणावळी, बँड, मंगलकार्यालयावर मोठा खर्च केला जातो. त्याची बचत झाली तसेच वराती व डिजेच्या तालावर नाचऱयांना आळा बसला.

रविवारी झालेल्या लग्न समारंभांमध्ये सकाळी चहा, पोहे, उप्पीट, शिरा यावरच काही वधुकडील मंडळींनी भागविले तर काही लग्नात जेवणाच्या पंक्ती उठल्या.   

Related Stories

श्रीकांत कदम यांची 1 लाखांची मदत

Patil_p

तपासणीसाठी सिव्हिलमध्ये येणाऱया संशयितांचा ओघ सुरूच

Patil_p

पेव्हरब्लॉक चोरी प्रकरणाची चौकशी करा

Omkar B

बॅरिकेड्समुळे सायकलस्वारांची कसरत

Amit Kulkarni

आरपीडी कॉलेजमध्ये शहीद दिनाचे आचरण

Amit Kulkarni

सरकारी विश्रामधामावरील स्वयंपाकी कोरोनाच्या कचाटय़ात

Patil_p
error: Content is protected !!