तरुण भारत

पाच वर्षाच्या विहानने एकट्याने केला दिल्ली ते बंगळूरू विमानप्रवास

ऑनलाईन टीम / बंगळूरू :

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉक डाऊन जारी करण्यात आला आहे. या लॉक डाऊनमुळे अनेक जण आपल्या घरापासून दूर अडकले आहेत. सध्या लॉक डाऊनचा चौथा टप्पा सुरू आहे. यामध्ये काही प्रमाणात शिथीलता आणली असून आजपासून देशांतर्गत विमान वाहतूक सुरू झाली.

Advertisements

लॉक डाऊनमुळे मागील तीन महिन्यांपासून पाच वर्षांचा विहान आपल्या आईपासून दूर होता. आईकडे जाण्यास त्याच्याकडे कोणतेही पर्याय उपलब्ध नव्हते. अशावेळी देशांतर्गत विमान वाहतूक सुरू झाल्यानंतर हा पाच वर्षीय विहानने आज दिल्लीहून एकट्याने कर्नाटकपर्यंत विमान प्रवास केला आणि आपल्या आई पर्यंत पोहचला आहे.

याबाबत अधिक माहिती देताना विहानची आई मंजिरी शर्मा यांनी सांगितले की, विहान गेल्या तीन महिन्यांपासून त्याच्या आजी आजोबांकडे अडकला होता. आज तो एकटाच दिल्ली ते बंगळूरू विमानाने परत येत आहे. तीन महिन्यांनी मी माझ्या बाळाला भेटणार आहे.

बंगळूरू एअरपोर्टला पोहोचल्यानंतर त्याची आई त्याला नेण्यासाठी आली होती. विहानला फ्लाईट स्टाफने त्याच्या आईपर्यंत सुरक्षित पोहोचविले. तब्बल तीन महिन्यांनी आई आणि मुलाची भेट झाली. पण त्यावेळी आईने सुरक्षेच्या दृष्टीने मुलाची गळाभेट घेण्याचे टाळले.

दरम्यान, आतापर्यंत कर्नाटक विमानतळावर दोन फ्लाईटस लॅंडिंग झालेल्या आहेत. त्यातील एका फ्लाईटने विहान बंगलोरला परतला आहे.

Related Stories

दिल्लीत मागील 24 तासात 66 नवे कोरोना रुग्ण; 79 डिस्चार्ज!

Rohan_P

गुजरातमध्ये 11 घुसखोर ताब्यात

Patil_p

पंजाबमध्ये कोरोनामुळे 44 वा मृत्यू, 43 नवे रुग्ण, एकूण संख्या 2201 वर 

Rohan_P

सलग बाराव्या दिवशी पेट्रोल – डिझेलच्या दरात वाढ; हे आहेत नवे दर

Rohan_P

हवाई दलप्रमुख फ्रान्स दौऱयावर

Patil_p

देशात संक्रमणाचा वेग मंदावला

datta jadhav
error: Content is protected !!