तरुण भारत

कोरोनामुळे जिल्ह्य़ात साधेपणाने ईद साजरी

गर्दी न करता घरीच उत्सवाला पसंती

प्रतिनिधी/ रत्नागिरी

Advertisements

मुस्लिम धर्मियांमध्ये अत्यंत पवित्र सण म्हणून साजरा रमजान ईद हा सण रमजान महिना संपल्यानंतर चंद्रदर्शन होताच सोमवारी मोठय़ा उत्साहात साजरा झाला. जिह्यासह साऱया देशात कोरोनाचा मोठा कहर सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जिह्यात ईद अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय मुस्लिम बांधवांनी घेतला होता. जिह्यात गर्दी न करता ईद मुस्लिम बांधवांनी घरीच अल्लाच्या प्रती नमाज अदा केल्यानंतर सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

  पापाला नष्ट करून पुण्य कमविणे हा रमजानचा खरा उद्देश आहे. मुस्लिम धर्मियांमध्ये मागील एक महिन्यांपासून रजमान मास सुरू होता. अल्लाच्या आज्ञेचे पालन करणे आणि शांततेचे रक्षण करत महिनाभर दर दिवशी 5 वेळा नमाज अदा करून तीस दिवस रोजा अर्थात उपवास धरले जातात. हा रमजान महिना सोमवारी ईदने साजरा करण्यात आला. पवित्र कुराण याच काळामध्ये प्रकटल्यामुळे या रमजान महिन्याला मुस्लिम धर्मियांमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. सोमवारी रत्नागिरी जिल्हाभरात नमाज पठण करून आबाल-वृद्धांनी ईद साजरी केली. 

   सोमवारी ईद हा सण मुस्लिम धर्मियांमध्ये मोठय़ा उत्साहात साजरा झाला. या सणात हिंदू बांधवही सहभागी होतात. सोमवारी येणाऱया ईदच्या मुहूर्तावर तरूण-तरूणी, महिला पुरूष सर्वजण नवीन कपडय़ाची खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी केली होती.  जिह्यासह साऱया देशात कोरोनाचा मोठा कहर सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जिह्यात ईद अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय मुस्लिम बांधवांनी घेतला होता.

  जिह्यात सोमवारी गर्दी न करता ईद साजरी झाली.  रत्नागिरीसह चिपळूण, राजापूर, लांजा, संगमेश्वर आदी तालुक्यांमध्ये ईद शांततेत साजरी करण्यात आली. ईद निमित्त मुस्लीम बांधवांनी आपापल्या मित्र परिवारासाठी मेजवानीचेही आयोजन केले होते. केवळ उपवास किंवा रोजे करून पाप अथवा पूण्य मिळत नसते, त्यासाठी जकातही करावी लागते. जकात म्हणजे दान होय. आपल्या ऐपतीप्रमाणे मुस्लिम बांधवांनी या ईद सणाच्या पार्श्वभूमीवर दानही केल.s

Related Stories

एसटीच्या उत्पन्नात दोन लाखांनी वाढ

Patil_p

कर्ज बोजाच्या नोंदीस मनाई केलेला शासन निर्णय रद्द

NIKHIL_N

मिरजोळेत अवैध मद्यसाठय़ावर पोलिसांची कारवाई

Patil_p

लोटेतील कामगारांसाठी आजपासून एस्.टी.धावणार!

Patil_p

नव्या अग्निशमन बंबाने लावली राजकीय आग!

Patil_p

खुराक बनलेल्या तहसीलच्या नूतनीकरणाकडे दुर्लक्ष?

Patil_p
error: Content is protected !!