तरुण भारत

धामणी येथे रेल्वेची धडक लागून गवा रेडय़ाचा मृत्यू

वार्ताहर/ संगमेश्वर

   संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथे रेल्वेची धडक बसून गवा रेडय़ाचा मृत्यू झाला आहे. सदरची घटना रविवारी घडली. धामणी रेल्वे मार्गावर गवा रेडा मृत अवस्थेत पडला असल्याची माहिती संगमेश्वर रेल्वे स्थानक प्रमुखानी देवरुख वनविभागाचे वनपाल सुरेश उपरे यांना सायंकाळी दिली.

Advertisements

   वनविभागाचे अधिकाऱयांना ही माहिती कळताच वनविभागाचे उपरे,वनरक्षक नानू गावडे,शर्वरी कदम सह वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. धामणी यादववाडीतील ग्रामस्थांच्या सहकार्याने मृत गवा रेडय़ाची वनविभागाने विल्हेवाट लावली. सदरचा मृत गवा हा नर जातीचा असून सात वर्षाचा होता. यासाठी स्थानिक ग्रामस्थांचे चांगले सहकार्य लाभल्याचे वनविभागाच्यावतीने सांगण्यात आले.

Related Stories

दोडामार्गातील जनआशीर्वाद यात्रा यशस्वी

NIKHIL_N

महामार्गावर अपघाताला निमंत्रण देणारा खड्डा अखेर इन्सुली युवकांनी बुजविला

Ganeshprasad Gogate

भाजपने खासदार राऊतांच्या विरोधात आंदोलन

Patil_p

फोंडाघाटवासीयांकडून आजीला जीवनआनंदचा ‘अर्था’सह आधार

NIKHIL_N

कोकण रेल्वे मार्गावर ईलेक्टीक काम करणाऱ्या स्पेशल गाडीला आग

Ganeshprasad Gogate

रत्नागिरी जिल्ह्यात ७ हजाराहून अधिक जण कोरोनामुक्त

Abhijeet Shinde
error: Content is protected !!