तरुण भारत

‘जिओ’ची जिओमार्ट वेबसाईट सुरू

पिनकोड सुविधा : दैनंदिन उत्पादने घरपोच मागवता येणार

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisements

देशातील दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने दूरसंचार क्षेत्रात जिओ प्लॅटफॉर्मचे सादरीकरण केले आहे. या प्लॅटफॉर्मच्या आधारे देशात विविध प्रकारच्या सुविधा देण्यासाठी आगामी काळात जिओकडून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे पहावयास मिळत आहे. याचाच एक भाग म्हणून रिलायन्स जिओच्या ई कॉमर्स पोर्टल जिओमार्ट वेबसाईटचे सादरीकरण करण्यात आले आहे. मागील काही महिन्यांपासून प्रायोगिक तत्वावर याची चाचणी करण्यात येत होती. मात्र अखेर त्याचे सादरीकरण करण्यात आले आहे.

कंपनीने ग्राहकांसाठी पिनकोडच्या माध्यमातून ऑर्डर घेण्यास सुरुवात केली आहे. ज्यामध्ये आपण जिओमार्टच्या वेबसाईट ओपन करून समोर येणाऱया बॉक्समध्ये आपला पिनकोड समाविष्ट केल्यास आपण राहत असलेल्या ठिकाणच्या माहितीचा तपशील मिळतो. याशिवाय आपणास हव्या असणाऱया उत्पादनांची मागणी करण्याची सुविधा उपलब्ध होणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. यायोगे आपल्याला वस्तु मागवता येतील.

मोफत घरपोच सुविधा

जिओमार्ट डॉट कॉमवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, 750 रुपयापेक्षा अधिकचे सामान खरेदी केल्यानंतर संबंधीत ग्राहकांना मोफत घरपोच सुविधा देण्यात येणार आहे आणि त्या किंमतीपेक्षा कमी खरेदी असल्यास 25 रुपयांचे शुल्क आकारण्यात येणार आहे.

क्हॉट्सऍपसच्याआधारे ऑर्डर

जिओमार्टच्या ग्राहकांना आता कोणत्याही प्रकारची ऑर्डर व्हॉट्सऍप नंबरच्या आधारे देता येणार आहे. याच्यासाठी कंपनीने एक नंबर सादर केला आहे. सदरचा नंबर हा नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण आदी ठिकाणच्या परिसरातील लोकांसाठी वस्तूंची मागणी करता करण्यासाठी दिलेला आहे.

Related Stories

तिसऱया दिवशी सेन्सेक्समध्ये 422 अंकांची घसरण

Patil_p

इ-कॉमर्स कंपन्यांच्या तक्रारींचे जलद निवारण

Patil_p

बँक ऑफ बडोदाने घटवले व्याजदर

Patil_p

डिजिटल व्यवहारांमध्ये तेजी?

Patil_p

जागतिक बाजारातील तेजीने सेन्सेक्सचा लाभ

Patil_p

जनधन खात्यांमध्ये महिलाच आघाडीवर

Patil_p
error: Content is protected !!