तरुण भारत

राज्यात दिवसभरात 51 जण संसर्गमुक्त

प्रतिनिधी/ बेंगळूर

कर्नाटकात सोमवारी एकूण 93 नव्या रुग्णांची भर पडली आहेत. मागील चार दिवसातील रुग्णसंख्येच्या तुलनेत हा आकडा कमी आहे. दुसरीकडे दोघांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. आतापर्यंत राज्यात 2182 रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील 44 जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी 51 जण बरे झाले असून त्यांना इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

Advertisements

मागील आठवडय़ात उडुपीत रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली होती. मागील 24 तासांत या जिल्हय़ात पुन्हा 32 नवे कोरोनाबाधित आढळून आले. गुलबर्गा जिल्हय़ात 16, यादगिरमध्ये 15, बेंगळूर शहर जिल्हय़ात 8, मंगळूर व धारवाडमध्ये प्रत्येकी 4, बळ्ळारी 3, मंडय़ा व कोलारमध्ये प्रत्येकी 2 तसेच बेळगाव, हासन, तुमकूर, विजापूर, कारवार, रामनगर जिल्हय़ात प्रत्येकी 1 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे.

त्यातील तिघे दुबईतून आलेले आहेत. तर 73 जण परराज्यातून आलेले आहेत.

मागील 24 तासांत 51 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामध्ये बेंगळूर शहर जिल्हय़ातील सर्वाधिक 19, गुलबर्गा जिल्हय़ात 10, बेळगाव जिल्हय़ातील 9, दावणगेरे 4, विजापूर आणि बागलकोटमधील प्रत्येकी 3, कारवार, हावेरी आणि मंडय़ा जिल्हय़ातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सोमवारी दिवसभरात बेंगळूर आणि मंगळूर जिल्हय़ात प्रत्येकी एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यात मृतांची संख्या 44 वर पोहोचली आहे. 19 मे रोजी इस्पितळात दाखल झालेल्या 55 वर्षीय महिलेचा उपचाराचा उपयोग न झाल्याने मृत्यू झाला आहे. तर मंगळूरमध्ये 43 वर्षीय कोरोनाग्रस्त पुरुषाचा मृत्यू झाला आहे. तो 23 मे रोजी मूत्रपिंडे निकामी झाल्याने इस्पितळात दाखल झाला. त्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला होता. सोमवारी त्याच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

Related Stories

पुलवामामध्ये चकमक; दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

datta jadhav

प्रतिबंधासाठी शिकस्त

tarunbharat

TMC मध्ये बंड; ‘या’ आमदाराचा राजीनामा

datta jadhav

धार्मिक भावना दुखावणाऱयांवर कारवाई

Patil_p

सरन्यायाधीश शरद बोबडे निवृत्त

Patil_p

कोरोना नियमांचे उल्लंघन; सपाच्या 2500 कार्यकर्त्यांवर गुन्हा

datta jadhav
error: Content is protected !!