तरुण भारत

कोलवाळ मुशीरवाडा येथे विहिरीतील प्रदूषित पाण्याने नागरिक त्रस्त

पंचायतीकडून मुख्यमंत्री प्रदूषण नियंत्रण मंडळ, आरोग्य खात्यास पत्र

वार्ताहर / रेवोडा

कोलवाळ औद्योगिक वसाहतीजवळ मुशीरवाडा येथील विहीरी रसायनिक स्त्रवामुळे प्रदूषित झाल्या आहेत. या प्रदूषित पाण्याच्या वासाने येथील रहिवासी त्रस्त झाले आहेत. याविषयी सदानंद वेरेकर या रहिवाशाने कोलवाळ पंचायतीकडे तक्रार केल्यानंतर पंचायतीने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदूषण नियंत्रण मंडळ, आरोग्य खाते, उद्योग व्यापार व वाणिज्य विभाग आदींना पत्र लिहून पाहणी करण्याची मागणी केली आहे.

कोलवाळ औद्योगिक नसाहतीतील अनेक कंपन्या व काही भंगार अड्डेवाले घातक रसायन जमिनीत सोडतात व ते रसायन विहिरींच्या झऱयांना मिश्रित होऊन विहिरीतले पाणी दूषित होते. आम्ही अनेकवेळा आरोग्य अधिकारी तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळवूनही कोणतीच कारवाई होत नाही असे सरपंच नितीन कांदोळकर यांनी सांगितले. प्रदूषित झालेल्या विहिरींचे पाणी पांढरे शुभ्र झाले असून त्या पाण्याचा वासही त्रासदायक असा येतो. आरोग्य खात्याच्या अधिकाऱयांनी पंचायतीसह काल संयुक्त पाहणी केली व पाण्याचे नमूने बरोबर घेऊन गेले.

Related Stories

दिड कोटीच्या जुन्या नोटा पोळे येथे जप्त

Patil_p

गोव्यात कोळसा ‘हब’ होऊ दिला जाणार नाही

Patil_p

अभियांत्रिकी अंतिम परीक्षा ऑन लाईनच घ्यावी

Omkar B

राज्यातील भाजपचे सरकार दिशाहीन

Patil_p

बीए, बीकॉम, बीएससी तृतीय वर्ष परीक्षा घ्याव्यात

Omkar B

योगेश गोयल यांच्याकडून ‘आयएमए’ ला मास्कचा पुरवठा

Omkar B
error: Content is protected !!