तरुण भारत

पार्सेत वाघाची दहशत : वाघाच्या हल्ल्यात गाईचे वासरू ठार : तर एक जखमी

मोरजी / प्रतिनिधी

पार्से गावात वाघाने  दहशत निर्माण केली असून सोमवारी पहाटे घुमकारवाडा –पार्से येथील मोहन साळगावकर यांच्या गोठय़ातील वासरावर केलेल्या  हल्यात  एक वासरू ठार केले तर एकाला गंभीर जखमी केल्याने गावात घबराट पसरली आहे

याबाबत सविस्तर वृत्त असे कि घुमकारवाडा पार्से येथील मोहन साळगावकर यांच्या भर लोकवस्तीत असलेल्या गोठय़ात सोमवारी पहाटे 3 च्या सुमारास वासराच्या ओरडण्याच्या आवाजाने  साळगावकर कुटुंबीय जागे झाले गोठय़ातील गुरे का ओरडतात म्हणून पाहण्यासाठी बाहेर आले असता त्यांना एक वाघ दृस्तीस पडला त्यावेळी सर्वांचीच तारांबळ उडाली मात्र खबरदारी म्हणून वाघाला घालवून देण्यासाठी मोठमोठय़ाने   डबे वाजवले  तरी वाघ काही तिथून जाण्याचे नाव काढीना तेव्हा  पाण्याचे रिकामे पिंप वाजवले असता वाघ गोठय़ातून जंगलात निघून गेला त्याच्या बरोबर दोन लहान बच्छडेही होते असे सांगण्यात आले

दरम्यान सकाळी नेहमी प्रमाणे जंगलातील काजू बागायतीत काहीजण गेले असता त्यांना या वाघाच्या डरकळीचा मोठा आवाज आल्याने भिवून लोकांनी जंगलातून माघार घेतली आणि आपल्या घरी आले

याविषयी बोलताना मोहन साळगावकर म्हणाले वाघाच्या हल्यात आपले गाईचे वासरू ठार झाले आणि एकाला  वाघाने जखमी केले  मात्र अशाच प्रकारे गेल्यावषी सुद्धा असाच वाघाने हल्ला केला होता मात्र वनखात्याने त्याचा बंदोबस्त लावला नाही परंतु यावषी तर या वाघाने भर लोकवस्तीत हल्ला करून वासराला ठार मारले आहे त्यामुळे आता आमच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे तरी वनखात्याने या वाघाचा बंदोबस्त करून मनुष्यहानी होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे सांगितले तसेच आपल्याला सरकारने नुकसान भरपाई ध्यावी अशी मागणी केली आहे

दरम्यान सोमवारी सकाळी वनखात्याच्या कर्मचार्यांनी घटना स्थळी भेट देवून पंचनामा  केला.

Related Stories

विविध उद्योगांतून मिळणार 37247 नोकऱया

Patil_p

गोवा डेअरीचे 2 ऑक्टो रोजी सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण

Patil_p

आंबे धुलैय ग्रामस्थांच्या नशिबी यंदाही होडीचा प्रवास

Omkar B

चिखली पंचायत क्षेत्रातील कचऱयाला हेडलॅण्ड सडय़ावरील लोकांचा विरोध

tarunbharat

गुळेली-कणकिरेला चक्रीवादळाचा तडाखा

Amit Kulkarni

शिरगाववासीयांची पाण्याची बिले जिल्हा खनिज निधीतून भरण्याचा प्रस्ताव

Patil_p
error: Content is protected !!