तरुण भारत

गोवा मराठी अकादमीच्या कविता स्पर्धेचा निकाल जाहीर

प्रतिनिधी / पणजी

गोमंतकीय काव्य प्रतिभेला उत्तेजन देण्यासाठी गोवा मराठी अकादमीने राज्यस्तरीय कविता लेखन स्पर्धेचे आयोजन केले होते. खुला गट व उच्च माध्यमिक – महाविद्यालयीन गट अशा दोन गटात घेण्यात आलेलया स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

Advertisements

खुल्या गटात प्रथम पारितोषिक रु. 5000 दीपा जयंत मिरिंगकर यांना त्यांच्या ‘त्याने नाही हिरावले तिच्या स्वप्नातले भाबडे क्षण’ या कवितेला प्राप्त झाले. द्वितीय पारितोषिक रु. 3000 दुर्गाकुमार नावती यांच्या ‘उभे कृतार्थ जीवन’ या कवितेला, तृतीय पारितोषिक रु. 2000 उर्वी भट यांच्या ‘बॅग’ या कवितेला तर उत्तेजनार्थ रु. 1000 ची पारितोषिके अपूर्वा ग्रामोपाध्ये यांच्या ‘माणसातली झाडं’ व संजय दत्तात्रय पाटील यांच्या ‘स्मार्ट फोन’ या कवितेला प्राप्त झाली आहेत.

उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन गटात प्रथम पारितोषिक रु. 3000 पार्वतीबाई चौगुले महाविद्यालय मडगावच्या श्रीया टेंगसे हिच्या ‘भूक’ या कवितेला लाभले आहे. द्वितीय पारितोषिक रु. 2500 गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय, फर्मागुडीच्या सर्वज्ञ दुर्गाकुमार नावती याच्या ‘पाखरू’ या कवितेला तर तृतीय पारितोषिक रु. 2000 गोवा विद्यापीठाच्या (मराठी विभाग) प्रतीक्षा उदय वझरेकर हिच्या ‘देवाचे देऊळ’ या कवितेला मिळाले. चौथे पारितोषिक रु. 1500 शासकीय महाविद्यालय केपेच्या शंतनू अय्या याच्या ‘ब्राह्मणत्व’ या कवितेला, पाचवे रु. 1000चे पारितोषिक शासकीय महाविद्यालय खांडोळाच्या सान्वी खांडेपारकर हिच्या ‘अमृतवेल’ कवितेला तर सहावे पारितोषिक रु. 500 शासकीय महाविद्यालय केपेच्या सिद्धी परीट हिच्या ‘भजन’ या कवितेला प्राप्त झाले आहे.

या कविता स्पर्धेचे परीक्षण डॉ. गीता सुनील येर्लेकर, अशोक नाईक व प्रा. पौर्णिमा केरकर यांनी केले.

Related Stories

दोन खास विमानांनी 423 पर्यटकांचे मायदेशी प्रयाण

Omkar B

कुंकळ्ळी पालिकेच्या पहिल्या बैठकीत उद्यान डागडुजीवरून गरमागरम चर्चा

Amit Kulkarni

राज्यातील काजू उत्पादनाचा दर प्रति किलो 11 रुपयाना घसरला

Amit Kulkarni

मडगावात शनिवारी सरकार विरोधात जाहीर सभा

Omkar B

कुडचडे पालिकेने एका दिवसाचा स्वेच्छा लॉकडाऊन जाहीर करावा

Patil_p

भाजप स्वतंत्रपणे निवडणूक लढवू शकतो

Amit Kulkarni
error: Content is protected !!