तरुण भारत

रायघर येथे आणखी एका कोरोना बाधित रुग्णाची वाढ

निकट सहवासात आल्याने महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

वार्ताहर / परळी

Advertisements

सातार्‍याच्या पश्चिमेकडील सज्जनगडच्या पायथ्याशी डोंगरात वसलेले रायघर हे छोटेसे गाव. जेमतेम 30 ते 35 घरांचे असलेले हे गाव कोरोनाच्या वाढत्या साखळीने हादरून गेले आहे. रायघर येथील पहिल्या दोन बाधितांच्या निकट सहवासातील त्यांच्या कुटुंबातील 42 वर्षीय महिलेचा रिपोर्ट सोमवारी रात्री पॉझिटिव्ह आल्याने संपूर्ण भागात खळबळ उडाली आहे.

सदर महिला मुंबई येथून प्रवास करुन 17 मे रोजी रायघर येथे आपल्या गावी आली होती. या महिलेच्या घरातीलच 2 व्यक्ती कोरोना बाधित आढळल्यानंतर या महिलेस विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. यानंतर सदर महिलेस काही लक्षणे दिसल्यानंतर 23 मे रोजी स्वॅब तपासणीत ही महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर एकच भयकंप भागात पसरला होता. वेळीच उपायोजना केल्याने आरोग्य विभाग तसेच वैद्यकिय अधिकार्‍यांच्या सतर्कतेमुळे रायघरचे वनवासमाची होण्यापासून बचाव झाला आहे.

Related Stories

मंत्री विश्वजीत कदम यांच्या कुटुंबातील तिघांना कोरोनाची लागण

Abhijeet Shinde

कोरोना : महाराष्ट्रात दिवसभरात 4 हजारपेक्षा अधिक नवे रुग्ण

Rohan_P

सातारा : 15 ऑगस्ट रोजी मिठाई विक्रीस सक्त मनाई – जिल्हादंडाधिकारी

Abhijeet Shinde

राज्यात पुराचं संकट त्यामुळे कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये ; मुख्यमंत्र्यांचं आवाहन

Abhijeet Shinde

पंचगंगा नदी प्रदुषण मुक्त करा: लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेची मागणी

Abhijeet Shinde

महाराष्ट्रात एका दिवसात 238 पक्षांचा मृत्यू

Rohan_P
error: Content is protected !!