तरुण भारत

2 जूनपासून धावणार यशवंतपूर- हजरत निजामुद्दीन रेल्वे

बेळगाववरून धावणार संपर्क क्रांती स्पेशल रेल्वे – आठवडय़ातून दोन फेऱयांचे नियोजन

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

देशात जून महिन्यापासून 200 लांब पल्ल्याच्या रेल्वे सुरू करण्यात येणार आहेत. त्यातील एक रेल्वे बेंगळूर (यशवंतपूर)- हजरत निजामुद्दीन या मार्गावर धावणार आहे. 2 जूनपासून ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. ही रेल्वे दर मंगळवार व गुरूवारी बेंगळूर येथून तर बुधवार व शुक्रवारी हजरत निजामुद्दीन येथे सुटणार आहे. आठवडय़ातून दोन फेऱयांचे नियोजन करण्यात आल्याचे हुबळी रेल्वे विभागाचे विभागीय व्यवस्थापक अरविंद मलकारे यांनी ट्वीट करून कळविले आहे.

लॉकडाऊन सुरू झाल्यापासू देशातील रेल्वे प्रवासी वाहतूक ठप्प होती. दि. 22 मे पासून बेंगळूर – बेळगाव दरम्यान एक स्पेशल रेल्वे सुरू करण्यात आली. परंतु पुणे तसेच उत्तर भारतात जाणारी रेल्वे सुरू करण्याची मागणी होत होती. अद्याप परराज्यात जाण्यासाठी वाहतूक व्यवस्था सुरळीत नसल्याने रेल्वे सुरू झाल्यास त्याचा फायदा प्रवाशांना होणार आहे.

अशी धावणार रेल्वे

दि. 2 जून पासून दुपारी 1 वाजून 55 मि. यशवंतपूर येथून ही रेल्वे सुटणार आहे. त्यानंतर तुमकूर, असिकेरे, दावणगेरे, हावेरी, हुबळी, धारवाड मार्गे रात्री 12 वाजून 31 मिनिटांनी बेळगावला पोहचणार आहे. त्यानंतर मिरज, पुणे, मनमाड, भूसावळ, भोपाळ, झांसी मार्गे दुपारी 1 वाजून 20 मि. हजरत निजामुद्दीन येथे पोहचणार आहे.

दि. 5 जूनपासून सकाळी वाजून 8.45 वा. हजरत निजामुद्दीन येथून रेल्वे सुटणार आहे. झांसी, भोपाळ, भूसावळ, मनमाड, पुणे, मिरज मार्गे सायंकाळी 6.48 वा. बेळगावला पोहचणार आहे. त्यानंतर धारवाड, हुबळी, हावेरी, दावणगेरे, असीकेरे, तुमकूर मार्गे सकाळी 6.21 वा. यशवंतपूर येथे पोहचणार आहे.

Related Stories

रायगड ते प्रतापगड मोहीम यशस्वी

Amit Kulkarni

कर्नाटक: राज्यातील खासगी रुग्णालयांना सरकारचा कारवाईचा इशारा

Abhijeet Shinde

आझादी का अमृत महोत्सवानिमित्त सायकल रॅली

Amit Kulkarni

रेल्वेमार्गादरम्यान गटारीची रुंदी वाढवा

Amit Kulkarni

यमकनमर्डी मतदारसंघातील ग्राम पंचायतीसाठी शेकडो अर्ज दाखल

Patil_p

कार अपघातात महिला जखमी

Rohan_P
error: Content is protected !!