तरुण भारत

सांगली : जन्मदात्या बापानेच केला मुलाचा खून

वार्ताहर/शिराळा/

शिराळा येथे आज दुपारच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. दारू पिऊन घरी त्रास देत असल्याच्या कारणावरून जन्मदात्या बापानेच मुलाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली. गजानन भगवान डांगे (वय ३२) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. वडील भगवान जगन्नाथ डांगे (वय ६०) यांनी गजानन याच्या डोक्यात दगड घालून खून केला. ही घटना आज, मंगळवारी दुपारच्या सुमारास नायकुडपुरा, येथील डांगे गल्ली येथे घडली. याबाबत मयत गजाननची पत्नीने शिराळा पोलिसात फिर्याद दिली आहे.

पोलिसातून मिळालेली माहिती अशी की, गजानन हा गेले अनेक दिवस काही हि काम धंदा करत नव्हता. त्यास दारूचे व्यसन होते. तो नेहमी दारू पिऊन आई वडील व पत्नीस शिवीगाळ करून मारहाण करत असे. सोमवारी त्याने पत्नीस मारहाण करून शिंगटेवाडी येथे माहेरी पाठवले होते. आज मंगळवारी सकाळ पासून तो दारूच्या नशेत होता. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास तो दारू पिऊन घरी जात आई वडिलांना शिवीगाळ केली. त्यावेळी रागाच्या भरात वडिलांनी याने शेजारीच असलेला दगड उचलून गजाननच्या डोक्यात घातला. यानंतर ते स्वतः पोलिसात जाऊन हजर झाले. खून करून पोलीस ठाण्यात येत असताना वाटेत त्याचा कायमचा काटा काढला असे बडबडत होता. शिराळा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. गजानन याच्या पश्चात वडील, आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुप्रिया दुरंदे करत आहेत.

Related Stories

आमदार पडळकर यांचे राज्यभर घोंगडी बैठकांचे आयोजन

Abhijeet Shinde

बळीराजाच्या शेती कामाला वेग

Abhijeet Shinde

30 लाखाचे दागिने व रोकड जप्त

Patil_p

दूध अनुदानासाठी भाजपाचा आंदोलनाचा इशारा

Patil_p

सांगली : मिरज शहरात पावसाची संततधार

Abhijeet Shinde

शिवाजी महाराजांचे पूर्वज कन्नड होते : उपमुख्यमंत्री

Abhijeet Shinde
error: Content is protected !!