तरुण भारत

ट्विटरने दिला डोनाल्ड ट्रम्प यांना थेट इशारा

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सोशल नेटवर्किंग साईट ट्विटर कडून त्यांनी केलेल्या ट्विटला फ्लॅग करत फॅक्ट – चेक चा‌ इशारा दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा देण्याची पहिलीच वेळ आहे. 


मंगळवारी ट्रम्प यांनी मेल इन बॅलोट हे एका फ्राॅड पेक्षा कमी नाही. त्यामुळे हा मार्ग नाही अशा आशयाचे ट्विट केले होते. या ट्विटर वर एक लिंक येत आहे. त्यावर लिहिलेले, मेल इन बॅलेट्स विषयी तथ्य जाणून घ्या. ही लिंक ट्विटर युजर्सना मोमेंट्स पेजवरील फॅक्ट – चेककडे घेऊन जाते. याठिकाणी डोनाल्ड ट्रम्प यांच्या अप्रमाणित दाव्यांबाबतच्या बातम्या दिसतात. 


डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, सोशल मीडिया कंपनी अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा गळा दाबत आहे. आणि मी राष्ट्राध्यक्ष म्हणून हे होऊ देणार नाही. असे म्हटले आहे. तसेच ट्विटर ट्रम्प यांच्या तीन नोव्हेंबर 2020 ला होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकीत हस्तक्षेप करत असल्याचा आरोपही ट्रम्प यांनी केला. 


दरम्यान, अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. असे असून सुद्धा ट्रम्प हे गोल्फ खेळताना दिसून आले होते त्यावरूनही त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. 

Related Stories

कंगना अडचणीत; कंगना विरोधात एफआयआर दाखल करण्याचे वांद्रे कोर्टाचे आदेश

pradnya p

अमेरिकेच्या लष्करी तळांवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला

prashant_c

अनंतनागमध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

datta jadhav

जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या 5 कोटींवर

datta jadhav

जम्मू : सीआरपीएफ श्रीनगर सेक्टरच्या महानिरीक्षक पदी चारू सिन्हा यांची नियुक्ती

pradnya p

कराचीत स्फोट; 5 ठार, 20 जखमी

datta jadhav
error: Content is protected !!