तरुण भारत

राजस्थानमध्ये कोरोना ग्रस्तांची संख्या 7376 वर 

ऑनलाईन टीम / जयपूर : 


राजस्थानमध्ये एका दिवसात 76 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राजस्थान मधील कोरोना बाधिताची एकूण संख्या 7 हजार 376 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. 


अधिकाऱ्यांनी सांगितले की, जयपूर 16, उदयपूर मध्ये 13, झालावाड मध्ये 12, राजसमंद मध्ये 11, झुंझुनू व बिकानेर मध्ये प्रत्येकी 5, कोटा 4, पाली मध्ये 3 आणि धौलपुर मधील 2 रुग्णांचा समावेश आहे. 


राजस्थान मध्ये आत्तापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांची संख्या 167 वर पोहोचली आहे.  मृत झालेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक संख्या जयपुर मध्ये आहे. कोरोनामुळे जयपूरमध्ये आत्तापर्यंत 79 जणांनी आपला जीव गमावला आहे. तर जोधपूरमध्ये 17 आणि कोटा मधील 16 जणांचा मृत्यू झाला आहे. पुढे ते म्हणाले, अधिकतर रुग्ण हे कोणत्या ना कोणत्या गंभीर आजारांनी पहिल्यापासून त्रस्त होते. 


दरम्यान, राज्यात 22 मार्चपासून लॉक डाऊन जारी असून, अनेक ठिकाणी कर्फ्यू लावला आहे. 

Related Stories

चिनी नागरिकांच्या भारत यात्रेवर निर्बंध

datta jadhav

अभिनेते आणि भाजपचे खासदार सनी देओल यांना कोरोनाची बाधा

pradnya p

हिमाचल प्रदेश : मेडिकल कॉलेजची महिला चिकित्सक चंदीगडमध्ये कोरोना पॉझिटिव्ह

pradnya p

देहरादून : क्वारंटाइन असलेल्या युवकाची आत्महत्या

pradnya p

अत्याधुनिक ११८ रणगाडे सेनेला अर्पण

Patil_p

महाराष्ट्र : राज्यमंत्री बच्चू कडू यांना दुसऱ्यांदा कोरोनाची बाधा

pradnya p
error: Content is protected !!