तरुण भारत

एअर इंडियाच्या विमानातून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा प्रवास, अन्य प्रवाशी 14 दिवसांसाठी क्वारंटाईन

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉक डाऊन जारी करण्यात आले आहे. लॉक डाऊनच्या चौथ्या टप्प्यात मात्र काही प्रमाणात शिथिलता आणली आहे. त्यानुसार, सोमवार पासून देशांतर्गत विमान सेवा सुरू करण्यात आली आहे. ही सेवा सुरू होऊन दोन दिवसही झाले नाहीत आणि एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या विमानातून एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने प्रवास केला आहे. या रुग्णाने दिल्ली ते लुधियाना असा विमान प्रवास केला. त्यामुळे या विमानातून प्रवास करणाऱ्या अन्य सर्व प्रवाश्यांना 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले आहे. 


एअर इंडियाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांने दिल्ली ते लुधियाना असा विमान प्रवास केला. अलायंस एअरच्या सिक्युरिटी विभागात ही व्यक्ती कार्यरत असून तिकिटाचे पैसे भरून या व्यक्तीने विमान प्रवास केला आहे. 


दरम्यान, याआधी देखील इंडिगो विमानात एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती. त्यामुळे आता विमान प्रवास करणे कितपत सुरक्षित आहे असा प्रश्न सर्वांसमोर पडला आहे. 

Related Stories

जेएनयू : हिंसाचाराशी संबंधित सदस्यांचे फोन जप्त करा : हायकोर्ट

prashant_c

धक्कादायक : वाशिममध्ये 229 विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग

pradnya p

चोवीस तासात देशात 27 हजार नवे रुग्ण

Patil_p

आई राहणार मुलांजवळ

Patil_p

महिलेच्या नावाने घर विकत घेतल्यास मुद्रांक शुल्कात सवलत देणार : अजित पवार

pradnya p

देशात 2.66 लाख कोरोनाबाधित

datta jadhav
error: Content is protected !!