तरुण भारत

मृतदेहावर अंत्यसंस्कारही झाले दुरापास्त

वार्ताहर / निपाणी :

जन्मलेल्याचे स्वागत तर मृताला भावपूर्ण निरोप देण्याची परंपरा भारतीय संस्कृती सांगते. आपल्याला ज्यांनी वाढवले, मोठे केले असे रक्ताचे नाते जपण्याची शिकवण आजही जपली जाते. पण कोरोना संसर्गाने यातही आडकाठी घातली असून प्रशासनाने खबरदारी म्हणून आंतरराज्य प्रवेशबंदी नाकारली आहे. यामुळेच आपल्या रक्ताचे नाते सांगणाऱया मृतदेहावर अंत्यसंस्कारही दुरापास्त झाले आहेत. प्रशासनाने यातून मार्ग काढत सीमेवरच अंत्यविधी करण्याची प्रक्रिया चालविली असून, नातेवाईकांतून याचे अतिव दुःख व्यक्त होत आहे.

Advertisements

बेळगाव तालुक्यातील बेनकनहळ्ळीच्या पीडीओंच्या पतीचे निधन मुंबई येथे अपघातामध्ये झाले. कोगनोळी टोलनाका येथे गुरुवारी ठाण्याहून लिंगराज बसवप्रभू बेळगावी (वय 53 रा. बैलहोंगल) यांचा मृतदेह आणण्यात आला. पण आंतरराज्य प्रवेश बंदीमुळे मृतदेह रोखण्यात आला. लॉकडाऊनमुळे त्यांचा मृतदेह कर्नाटकात पाठविण्यास अडचण आली. त्यामुळे काही मोजक्मयाच नातेवाईकांच्या उपस्थितीत कोगनोळी टोलनाक्मयाजवळील गायरान जागेत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

लिंगराज हे मुंबई येथे एल ऍन्ड टी कंपनीत सेवा बजावत होते. बुधवारी दुपारी 3 वाजता त्यांना एका कारची धडक बसली. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांचा मृतदेह मूळ गावी आणण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र ते शक्मय झाले नाही. त्यामुळे टोलनाक्मयाजवळ त्यांची पत्नी सुजाता, मुलगा, मुलगी, वडील बसवप्रभू, भाऊ शिवानंद, निपाणीचे तहसीलदार प्रकाश गायकवाड, तालुका पंचायत अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी, चिकोडी तालुका पंचायतीचे साहाय्यक सचिव शिवानंद, पीडीओ रवी यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

कोरोनाचा मृत्यूनंतरही फटका

कोरोनाचा वाढता संसर्ग प्रत्येकाला मरणाची अनुभूती देत आहे. मृत्यू जवळ आला अशीच भीती व्यक्त होत आहे. कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून सर्वोतोपरी खबरदारी घेतली जात आहे. खबरदारीचा एक भाग म्हणून आंतरराज्य बंदीचा निर्णय घेतला गेला आहे. यातून मृतदेहालाही सुटका दिलेली नाही. यामुळे मृत व्यक्तीची आपल्या गावाकडे अंत्यसंस्कार करण्याची अंतिम इच्छा देखील नाकारली जात आहे. याचे दुःख प्रत्येक नातेवाईक व्यक्त करतो. पण याचे गांभीर्य कोणीच घेताना दिसत नाही. असे असले तरी कोरोनाला रोखण्यासाठी याचे गांभीर्यही ओळखणे सर्वांचे कर्तव्य असल्याचे जाणकारांतून व्यक्त होत आहे.

Related Stories

खानापुरातील महाविद्यालयांतील विद्यार्थी-प्राध्यापकांची स्वॅब तपासणी

Omkar B

कर्नाटकी अन्यायांच्या जोखडातून सीमावासियांना सोडवा

Amit Kulkarni

इनरव्हील क्लबतर्फे राजहंसगड येथे 500 रोपांची लागवड

Patil_p

नियमांचे पालन करत महामाया देवीची यात्रा साजरी करा

Patil_p

खानापूर बँकेचे संचालक मारुती पाटील यांची ‘तरुण भारत’ कार्यालयाला भेट

Amit Kulkarni

अलारवाड क्रॉस येथे होणार उड्डाणपूल

Patil_p
error: Content is protected !!