तरुण भारत

सावर्डे येथे गव्यारेडय़ाला विहीरीतून सुखरूप जीवदान

वाळपई प्रतिनिधी

 सत्तरी तालुक्मयातील जैवविविधता अत्यंत श्रीमंत असल्याचे मानले जात आहे. या भागातील पूर्वजांनी वेगवेगळय़ा माध्यमातून अधोरेखित केलेली जंगल संपत्ती यामुळे पश्चिम घाटात श्रीमंत इतिहास सांगणाऱया सत्तरी तालुक्मयाने आतापर्यंत नैसर्गिक साधन संपत्तीचे वेगवेगळय़ा स्तरावर रक्षण केले आहे. हल्लीच्या काळात विकासाच्या माध्यमातून जंगलामध्ये वाढणारे काँक्रिटीकरण याचे विपरीत परिणाम आज समाजामध्ये पहावयास मिळत आहे. शेकडो वर्षापासून समृद्ध जंगल संपत्तीमध्ये राहणारे रानटी प्राणी आता हळूहळू लोकवस्तीकडे वळू लागले आहेत. यामुळे त्यांचे रक्षण व संवर्धन करण्याचे कार्य सत्तरी तालुक्मयातील प्राणिमित्र संघटना पर्यावरण प्रेमी आपापल्यापरिने करताना दिसत आहेत. गुरुवार दिनांक 28 मे हा सत्तरी तालुक्मयासाठी रानटी जनावरे संवर्धन दिवस ठरला .वेगवेगळय़ा दोन ठिकाणच्या घटनांमुळे पाडेली या ठिकाणी दहा फूट लांबीच्या किंग कोब्राला जीवदान देण्यास सर्पमित्र प्रदीप गंवडळकय यांना चांगल्या प्रकारचे यश आले. या पंचायत क्षेत्रातील सावर्डे गावात एका खंदकात पडलेल्या गव्याला जीवदान देण्यात वनखात्याची यंत्रणा यशस्वी ठरली. यामुळे आजच्या या दोन घटनांच्या माध्यमातून निसर्गाचा महत्वाचा घटक समजल्या जाणाऱया साप व गव्याआलल जीवदान प्राप्त झाले.

Advertisements

पाडेली येथे किंग कोब्राला जीवदान

भिरोंडा पंचायत क्षेत्रातील पाडेली ठिकाणी रामचंद्र नाईक यांच्या घरांमध्ये लपून बसलेल्या सहा फूट किंग कोब्राला बुधवारी मध्यरात्री सर्पमित्र प्रदीप गवंडळकर यांनी जीवदान दिले. या घरातील एका शेजारी असलेल्या खोलीमध्ये हा किंग कोब्रा लपून बसला होता .यावेळी त्यांनी कोंबडीची पाच अंडी व दोन पिल्लू फस्त केली होती. यासंदर्भातील माहिती मिळताच सर्पमित्र प्रदीप  त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी रात्री एक वाजता घटनास्थळी धाव घेऊन या सापाला जीवदान दिले. या संदर्भात बोलताना प्रदीप यांनी सांगितले की सदर किंग कोब्रा हा साठा करून ठेवलेल्या नारळाच्या गोदाम मध्ये लपून बसला होता. सदर साप हा जवळपास सहा फूट लांबीचा असून त्याला सुखरूपरित्या म्हादई अभयारण्याच्या अधिकाऱयांकडे सुपूर्द करण्यात आलेले आहे.

 दरम्यान प्रदीप यांनी केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे रामचंद्र नाईक व त्यांच्या यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे आभार व्यक्त केले असून मध्यरात्री जवळपास एक वाजण्याच्या सुमारास त्यांना या संदर्भात माहिती देण्यात आल्यानंतर तातडीने घटनास्थळी धाव घेऊन त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत.

सावर्डे येथे गव्यारेडय़ाला जीवदान.

दरम्यान सत्तरी तालुक्मयातील सावर्डे पंचायत क्षेत्रातील सावर्डे याठिकाणी एका खाजगी जमीनीत  मंदिराशेजारी असलेल्या एका विहिरी मध्ये गुरुवारी पहाटे गवारेडा पडून अडकून राहिला. सदर भागांमध्ये सातत्याने गव्यांचा वावर आढळून येत असून यामुळे मोठय़ा प्रमाणात शेत बागायतीचे नुकसानी करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. आज सकाळी सदर गवा एका विहिरीत पडल्याची  माहिती मिळताच या संदर्भाची जाणीव प्राणिमित्र प्रदीप गवंडळकर यांना देण्यात आल्यानंतर त्यांनी तातडीने या संदर्भाची माहिती खात्याचे यंत्रणेला दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी दीपक तांडेल यांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर गव्याला जीवदान देण्यासाठी महत्वाचे योगदान दिले. यावेळी या बचावकार्यात म्हादई अभयारण्याचा अधिकारीवर्ग, फोंडा वनखात्याची यंत्रणा यांनी महत्वाची भूमिका वठविली. यावेळी वनखात्याचे एसीएफ आनंद जाधव यांनी बचाव कार्याला मार्गदर्शन करून गव्याला जीवदान देण्यासाठी मदत केली. नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार सदर गवारेडा पहाटे सदर विहिरीत पडल्याचे सांगण्यात आले. काही दिवसापासून सदर भागांमध्ये गव्याचा वावर मोठय़ा प्रमाणात आढळून येत असून अनेकांची कृषी पिके त्यांच्याकडून फस्त करण्यात येत असल्यामुळे नागरिकांत यासंदर्भात तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त करण्यात येत आहे .वनखात्याच्या यंत्रणेने सदर भागातून गव्यांना हाकलून लावण्यासाठी मोहीम हाती घ्यावी अशा प्रकारची मागणी करण्यात आली आहे. वनपरिक्षेत्राधिकारी दीपक तांडेल यांनी यासंदर्भात अधिक माहिती देताना अडकलेल्या गव्याला सुखरूपपणे विहिरीतून बाहेर काढल्यानंतर त्यांनी जंगलात पलायन केल्याचे स्पष्ट केले.

यामुळे जवळपास सहा तास सदर विहिरीमध्ये गवा अडकल्याने त्यांच्यावर मानसिक ताण येण्याची शक्मयता वनखात्याच्या अधिकाऱयांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे येणारे काही दिवस त्यांच्यावर नजर ठेवण्यात येणार असून त्यांनी कोणत्याही प्रकारची दहशत करू नये यासाठी आवश्यक स्वरूपाची उपाययोजना करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे

Related Stories

शांतादुर्गा वेर्डेकरीण संस्थानात नवीन महाब्रह्मरथाची भर

Amit Kulkarni

पेडणे तालुक्मयालाही चक्रीवादळाचा तडाखा

Amit Kulkarni

गोव्यात भाजपाच पुन्हा सत्ता प्राप्त करेल

Amit Kulkarni

सरकारने ऑनलाईन शिक्षणासाठी ‘इंट्रानेट’ सुविधेचा वापर करावा विरोधी पक्षनेते श्री. कामत यांची मागणी

Omkar B

मुंबईतील 189 खलाशांना गोव्यात आणणार

Omkar B

ताप आल्याने बाबूश मोन्सेरात गोमेकॉत दाखल

Patil_p
error: Content is protected !!