तरुण भारत

घाऊक मासळी मार्केटचा वाद शिंगेला आठ वाहनाची नासधुस

प्रतिनिधी/ मडगाव :

मडगावच्या घाऊक मासळी मार्केटाजवळ पार्क करण्यात आलेल्या आठ मासळी वाहू वाहनाची अज्ञातांनी दगड मारून नासधुस करण्याचा प्रकार काल गुरूवारी घडला. ही वाहने बुधवारी रात्री मासे घेऊन आली होती. या प्रकरणी फातोर्डा पोलीस स्थानकावर तक्रार नोंद करण्यात आली आहे.

मडगावचे घाऊक मासळी मार्केट लॉकडाऊनच्या काळात बंद होते. ते पुन्हा सुरू करण्यास उपजिल्हाधिकाऱयांनी मान्यता दिली आहे. एसजीपीडीएने सुद्धा मार्केट खुले करण्यासाठी तयारी केली होती. मात्र, अद्याप हे मार्केट खुले झालेले नाही. त्यामुळे इतर राज्यातून मासळी घेऊन येणारी वाहने एसजीपीडीएच्या मार्केटच्या बाहेर पार्क करून तेथेच मासळी विक्री केली जाते.

एसजीपीडीए मार्केटच्या बाहेर मासळी विक्री केली जात असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यातूनच कालची घटना घडली असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. वाहनाची नासधुस केल्याची तक्रार अज्ञानात व्यक्तीच्या विरूद्ध फातोर्डा पोलीस स्थानकावर नोंद केली असली तरी काल उशिरा पर्यंत कुणावरही कारवाई झाली नव्हती.

दरम्यान, एसजीपीडीए मार्केटच्या बाहेर वाहने पार्क करून मासे विक्री करणाऱयाच्या विरोधात फातोर्डा पोलिसांनी काल कारवाई करताना, त्यांना तेथून हाकलून लावले. त्याच बरोबर एसजीपीडीए किरकोळ मासळी मार्केटाजवळ सुकी मासळीची विक्री केली जात असून त्या ठिकाणी सामाजिक अंतर ठेवले जात नसल्याने पोलिसांनी सर्वांना ताकीद दिली आहे.

गोवेकरांना स्वस्त दरात मासळी पुरवू

सद्या एसजीपीडीएचे घाऊक मासळी मार्केट बंद असल्याने, गोव्याबाहेरील मासळी आणणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे गोवेकरांना महागडय़ा दरात मासळी खरेदी करावी लागते. मात्र, आम्ही गोवेकरांना स्वस्त दरात मासळी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती एसजीपीडीए घाऊक मासळी मार्केटातील एजंन्ट इब्राहिम यांनी दिली आहे.

शेजारील राज्यातून भाजी, फळे, दूध आणले जाते तर केवळ मासळीवर बंदी का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. गोव्यात काहीच उपलब्ध होत नसल्याने शेजारील राज्यावर अवलंबून रहावे लागते. आत्ता पावसाळय़ात गोव्यात मासेमारी बंद होईल, अशावेळी गोव्याला शेजारील राज्यातून मासळी आणावी लागते. ती कोविड-19ची सर्व मार्गदर्शन तत्वाचे पालन करून आणण्याची आमची तयारी आहे. त्यासाठी एसजीपीडीए मार्केट लवकर खुले करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

मार्केट खुले करण्यास मान्यता पण…

एसजीपीडीए घाऊक मासळी मार्केट खुले करण्यास उपजिल्हाधिकाऱयांनी मान्यता दिली आहे. एसजीपीडीएचे चेअरमन विल्प्रेड डिसा यांनी ही मार्केट खुले करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे बोलणी केली होती. या मार्केटात मासळी घेऊन येणाऱया सर्व वाहनाची नोंदणी करावी अशी अट घातली होती. सुरवातीला या अटीला प्रतिसाद  मिळाला नव्हता. मात्र, आत्ता वाहनाची नोंदणी करायची तयारी वाहन मालकांनी केली तरी मच्छीमारमंत्री फिलीप नेरी रोड्रिग्स हे प्रतिसाद देत नसल्याने मार्केट बंद राहिले आहे.

या घाऊक मासळी मार्केटात कोटय़ावधी रूपयांची उलाढाल होत असल्याने हे मार्केट महत्वाचे मानले जात आहे.

मार्केट खुले करण्यास ट्रॉलर मालकांचा विरोध

हे घाऊक मासळी मार्केट खुले करू नये अशी मागणी यापूर्वीच गोव्यातील ट्रॉलर मालक तसेच होडीद्वारे मासेमारी करणाऱया मच्छीमाऱयांनी केली आहे. या मार्केटात येणारी मासळी ही ताजी नसते तसेच मासळीवर फॉर्मेलिनचा वापर केला जात असल्याचा दावा त्यांनी केला होता. गोवेकरांना ताजी मासळी केवळ गोव्यातूनच मिळू शकते. आत्ता मासेमारी बंदी जवळ आलेली आहे. त्यामुळे हे मार्केट आत्ता खुले न करताना पुन्हा मासेमारीला प्रारंभ झाल्यानंतर खुले करावे अशी मागणी करण्यात आलेली आहे.

माजी मंत्री मिकी पाशेको यांनी देखील एसजीपीडीएचे मार्केट खुले करू नये अशी मागणी केलेली आहे. हे मार्केट खुले करावे यासाठी कोटय़ावधी रूपयांचा व्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केला होता.

Related Stories

गणरायाच्या स्वागताची तयारी जोरात

Omkar B

आय-लीगमध्ये चर्चिल ब्रदर्सचा पहिला पराभव; गोकुळम विजय

Amit Kulkarni

मोपा विमानतळ संघर्ष समितीच्या कार्यकर्त्याना अटक केल्या प्रकरणी, सरकारचा निषेध

Patil_p

गोव्यात रेती व्यवसाप सुरू करण्यासाठी सरकारचे प्रयत्न : मुख्यमंत्री

Amit Kulkarni

गोमंत विद्या निकेतनच्या नाटय़स्पर्धेत ‘बुडबुड रे घागरी’ प्रथम

Patil_p

आयआयटी रद्द केल्याचे लेखी आश्वासन मिळे पर्यंत आंदोलन चालूच

Patil_p
error: Content is protected !!