तरुण भारत

अखेर तासगाव आगारातील ‘ती’ महिला अधिकारी निलंबित

विभाग नियंत्रकांची कारवाई : खातेनिहाय चौकशी सुरु: कार्यालयात बसून आक्षेपार्ह टिकटॉक व्हिडिओ बनवणे पडले महागात

सांगली/प्रतिनिधी

Advertisements
तासगाव आगाराच्या कार्यालयात बसून टिकटॉकसाठी व्हिडिओ तयार केल्याने मीना पाटील या वाहतूक निरीक्षकेस निलंबित करण्यात आले आहे. संबंधित आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावरून 'व्हायरल' झाल्यानंतर सर्व स्तरातून टीका होत होती. याची दखल घेत विभाग नियंत्रक अमृता ताम्हणकर यांनी मीना पाटील यांना निलंबित केले. सध्या पाटील यांची खातेनिहाय चौकशी सुरू करण्याचे आहे.

मीना पाटील या तासगाव आगारात वाहतूक निरीक्षक म्हणून काम करतात. सध्या कोरोनाने थैमान घातले असून या काळातही एसटी कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. मात्र दुसरीकडे मीना पाटील या अधिकाऱ्याने थेट आगाराच्या कार्यालयात बसून टिकटॉक व्हिडिओ बनवले व सोशल मीडियावर प्रसारित केले. हे व्हिडिओ'व्हायरल' झाल्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका झाली. एसटी कार्यालयात ऑन ड्युटी असताना असे व्हिडिओ केल्याने कर्मचाऱ्यातुन राग व्यक्त करण्यात आला होता.
हे सर्व व्हिडिओ, त्यातील हावभाव, आक्षेपार्ह डायलॉग यामुळे पाटील यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई व्हावी, अशी मागणी झाल्याने, त्यांच्यावर नुकतीच कारवाई करण्यात आली.

या आगारातील अधिकाऱ्यांबाबत अनेक तक्रारी यापूर्वीदेखील विभाग नियंत्रकांकडे आल्या आहेत. त्यामुळे विभाग नियंत्रक ताम्हणकर यांनीही गंभीर दखल घेत पाटील यांना निलंबित केले आहे. सध्या पाटील यांची खातेनिहाय चौकशीही सुरु असल्याचे सांगण्यात आले.

Related Stories

सेंकड लीड पोलीस मुख्यालय नवीन इमारतीसाठी प्रस्ताव

Patil_p

कोरोनाचे नियम मोडणाऱयांकडून 11 लाखांचा दंड वसूल

Patil_p

‘तीन टीएमसी पाणी दिल्यास तात्पुरती योजना राबवू’

Abhijeet Shinde

महाराष्ट्रात मागील 24 तासात 36,176 रुग्ण कोरोनामुक्त!

Rohan_P

कोरेगाव शहरात दोन व्हिडिओ गेम पार्लरवर पोलिसांचा छापा

Patil_p

फलटणमध्ये दोन चोरटे जेरबंद

Patil_p
error: Content is protected !!