तरुण भारत

कृष्णा हॉस्पिटलमधून आणखी 9 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज

कराड,  

 : कराड तालुक्यातील  म्हासोली, इंदोली, भरेवाडी आणि मेरवेवाडी येथील एकुण 9 कोरोनामुक्त रुग्णांना आज कृष्णा हॉस्पिटलमधून टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये म्हासोली येथील 5 कोरोनामुक्त रुग्णांचा समावेश असल्याने, सलग दुसऱया दिवशी म्हासोलीकरांना दिलासा मिळाला आहे. आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलमध्ये एकूण 77 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

Advertisements

वनवासमाची आणि मलकापूरनंतर हॉटस्पॉट बनलेल्या म्हासोली गावातील 8 कोरोनामुक्त रुग्णांना गुरुवारी (ता. 28) डिस्चार्ज देण्यात आला. पण पुन्हा त्याच दिवशी रात्री आलेल्या अहवालात म्हासोली येथे पुन्हा 8 नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची भर पडली. त्यामुळे कोरोनामुक्तीचा आनंद फार काळ टिकला नाही.

दरम्यान, गेले काही दिवस कृष्णा हॉस्पिटलच्या कोरोना वॉर्डमध्ये उपचार घेत असलेली म्हासोली येथील 60 वर्षीय महिला, 50 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय पुरुष, 50 वर्षीय पुरुष आणि 12 वर्षीय मुलगी अशा 5 कोरोनाग्रस्त रुग्णांचे उपचारानंतरचे अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यांना आज टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. तसेच इंदोली येथील 39 वर्षीय पुरुष, भरेवाडी येथील 52 वर्षीय पुरुष, 43 वर्षीय महिला, मेरमेवाडी येथील 23 वर्षीय पुरुष अशा अन्य 4 कोरोनाग्रस्त रुग्णांचे अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यांनाही आज डिस्चार्ज देण्यात आला. 

यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता देशमुख, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक ए. वाय. क्षीरसागर, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, प्राचार्य डॉ. एस. टी. मोहिते, डॉ. शशीकिरण एन. डी., डॉ. संजय पाटील, डॉ. रोहिणी बाबर, डॉ. विश्वास पाटील, वैशाली यादव, नीता शेवाळे, नीता इनामदार, मंजुषा कुलकर्णी यांच्यासह हॉस्पिटलचा अन्य स्टाफ उपस्थित होता.

Related Stories

LIVE : उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून कोल्हापुरातील पूरस्थितीचा आढावा

Abhijeet Shinde

‘गृहनिर्माण’ला आपला उमेदवार निवडून आणायचाच

Patil_p

सातारा : शिवसेना शहरप्रमुखपदी निलेश मोरे

datta jadhav

सोमय्या आणखी चार मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढणार

Abhijeet Shinde

सांगली : तर संबंधित रुग्णालयाचा परवाना रद्द करणार

Abhijeet Shinde

कोरोना संकटामुळे यावर्षीचा विजय दिवस समारोह रद्द

Patil_p
error: Content is protected !!