तरुण भारत

राजस्थानमध्ये एका दिवसात 91 नवे कोरोना रुग्ण, तर दोन जणांचा मृत्यू

ऑनलाईन टीम / जयपूर : 


राजस्थानमध्ये एका दिवसात 91 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राजस्थान मधील कोरोना बाधिताची एकूण संख्या 8 हजार 158 वर पोहचली आहे. तर कालच्या एका दिवसात 2 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. 

Advertisements


अधिकाऱ्यांनी सांगितले की, शुक्रवारी कोरोना व्हायरसमुळे 2 जणांचा मृत्यू झाला. त्यातील एक जयपूर मधील तर दुसरा रुग्ण झुंझुनू येथील होता. या दोन मृत्यूमुळे राज्यात आता पर्यंत एकूण 182 लोकांनी आपला जीव गमावला आहे. 

यामध्ये कोरोनामुळे जयपूरमध्ये आत्तापर्यंत 86 जणांनी आपला जीव गमावला आहे. तर जोधपूरमध्ये 17 आणि कोटा मधील 16 जणांचा मृत्यू झाला आहे. पुढे ते म्हणाले, अधिकतर रुग्ण हे कोणत्या ना कोणत्या गंभीर आजारांनी पहिल्यापासून त्रस्त होते. 

तर मागील चोवीस तासात आढळल्या 91 रुग्णांपैकी नागौरा आणि  जयपूरमध्ये 12-12, झालावाडमध्ये 42, उदयपुर आणि धौलपुर मधील पाच – पाच, चुरू मधील 6 रुग्णांचा समावेश आहे. 


दरम्यान, राज्यात 22 मार्चपासून लॉक डाऊन जारी असून, अनेक ठिकाणी कर्फ्यू लावला आहे. 

Related Stories

नाशिक येथे होणारे 94 वे साहित्य संमेलन स्थगित

Patil_p

TMC मध्ये बंड; ‘या’ आमदाराचा राजीनामा

datta jadhav

अकरावी फेरीही तोडग्याविना

Patil_p

स्वयंचलित मेट्रो सेवेचा दिल्लीत शुभारंभ

Patil_p

“जान मोहम्मदचे दाऊद गँगशी २० वर्षांपासून संबंध”, एटीएसचा खुलासा

triratna

उत्तराखंड : भाजपचे प्रदेश अध्यक्ष बंशीधर भगत यांच्या मुलाला कोरोनाची बाधा

Rohan_P
error: Content is protected !!