तरुण भारत

पॅलेसमध्ये हिटलरचा 28 टन सोन्याचा साठा

वर्साय :

दुसऱया महायुद्धाच्या दरम्यान हिटलरकडे असणारे 28 टन सोने पोलंडच्या एका महालात दडवून ठेवण्यात आले असल्याचा खुलासा एका सैनिकी डायरीमधून करण्यात आला आहे. या गोष्टीवरुन हिटलरला सोन्याचा शौक असल्याचे समोर आले आहे. सदरचे सोने हे एका मोठय़ा महालात साठवून ठेवल्याची माहिती आहे. हिटलरने आपले सोने हे रशियातील सेनेपासून बचाव करण्यासाठी हा खजान्यात लपवून ठेवल्याचीही नोंद यामध्ये करण्यात आली आहे. पोलंड येथील व्रोकला शहराच्या आसपासच असणाऱया होचबर्ग पॅलेसमध्ये ही सोन्याची संपत्ती एका मैदानात बंदीस्त करुन ठेवल्याचे समोर आले आहे. ही संपत्ती प्रामुख्याने सोन्याची नाणी आणि दागिन्यांचा 28 टनाचा साठा 1.25 अब्ज इतकी सध्या त्यांची किमत होत असल्याचेही स्पष्ट होत आहे. जमिनीच्या आत 200 फूट खोल विहीरीसारख्या आकाराच्या खड्डय़ात संपत्ती लपवून ठेवली असल्याचे स्पष्टीकरण केले आहे. ही माहिती हिटलरच्या एका सैनिकाने आपल्या स्वतःच्या डायरीत लिहून ठेवली असल्याचे समोर आले आहे. ा

Advertisements

हिटलरच्या सैन्यामधील एका खासगी शिपायाने आपल्या अनुभवाची एक डायरी लिहून ठेवली आहे. त्यामध्ये यासर्व बाबीच्या नोंदी करुन ठेवल्या असल्याचा खुलासा यातून समोर आला आहे. म्हणजे दुसऱया महायुद्धाच्या वेळी जर्मनीकडून खजाना जमिनीत पुरुन ठेवला असल्याची शंका समोर येत असल्याचेही या डायरीमधून स्पष्ट केले आहे.

अमेरिकेच्या लेझर शस्त्रांची यशस्वी चाचणी

Related Stories

चाहूल वसंताची

tarunbharat

दूषित पाण्याचा वापर टाळा

Patil_p

गोष्ट नव्या इंजिनाची

Omkar B

टॉवेल आर्ट

Patil_p

अमूल्य सौंदर्य

Patil_p

महत्त्व कलेचे

Patil_p
error: Content is protected !!