तरुण भारत

तुरमुरी येथील महिला कोरोना पॉझिटिव्ह

क्वारंटाईन संपवून घरी पोहोचल्यानंतर आला अहवाल

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

मुंबईहून तुरमुरी (ता. बेळगाव) येथे माहेरी आलेल्या एका 30 वषीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तिच्या कुटुंबीयांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. 14 दिवसांच्या क्वारंटाईनची मुदत संपल्यामुळे ही महिला आपल्या घरी पोहोचली होती. त्यानंतर तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला. जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 140 वर पोहोचली आहे.

शनिवारी राज्य आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटिनमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. शनिवारपासून आता केवळ सायंकाळीच बुलेटिन जारी करण्याचे सरकारने ठरविले आहे. त्याची अंमलबजावणीही सुरू करण्यात आली. गेल्या 24 तासांत राज्यातील 141 जणांना कोरोनाची लागण झाली असून यामध्ये तुरमुरी येथील 30 वर्षाच्या महिलेचा समावेश आहे.

उपलब्ध माहितीनुसार ही महिला 14 मे रोजी मुंबईहून तुरमुरी येथील आपल्या माहेरी आली होती. त्यानंतर तिच्यासह मुंबईहून आलेल्यांना गावातील शाळेत क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. तुरमुरी हे या महिलेचे माहेर आहे. तर चंदगड तालुक्मयातील आंबेवाडी हे तिचे सासर आहे. एकूण 11 जणांना 14 दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. यापैकी महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

14 दिवसांचे क्वारंटाईन संपल्यानंतर ती आपल्या घरी गेली होती. त्यानंतर तिचा स्वॅब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे प्रशासनाची एकच धावपळ उडाली. रुग्णवाहिकेतून तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. तर तिच्या कुटुंबीयांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. बेळगुंदी पाठोपाठ आता तुरमुरी येथेही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने खळबळ माजली आहे.  

चालक व त्याचे कुटुंबीयही क्वारंटाईनमध्ये

तुरमुरी येथील महिलेला कारमधून गावी पोहोचविणाऱया काकती येथील चालक व त्याच्या कुटुंबीयांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. त्या 30 वषीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह येताच पोलीस व आरोग्य विभागातील अधिकाऱयांनी काकती येथील कार चालकाला व त्याच्या कुटुंबीयांना गाठून त्यांना क्वारंटाईनमध्ये हलविले.

आज कर्फ्यू नाही

लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर कर्नाटकात रविवारी दिवसा कर्फ्युचा आदेश देण्यात आला होता. या आदेशानुसार शनिवारी सायंकाळी 7 पासून सोमवारी सकाळी 7 पर्यंत 36 तास कर्फ्यु असायचा. या आदेशात बदल करुन रविवारी 31 मे रोजी दिवसा कर्फ्यु रद्द करण्यात आला आहे.

राज्याचे मुख्य सचिव टी. एम. विजयभास्कर यानी या संबंधीचा आदेश दिला आहे. शनिवारी जारी करण्यात आलेल्या नव्या आदेशानुसार रोज सायंकाळी 7 ते दुसऱया दिवशी सकाळी 7 पर्यंत जमावबंदीचा आदेश असणार आहे. रविवारी पूर्ण दिवस कर्फ्यु रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे रविवारी सकाळी 7 पासून व्यवहार सुरळीत राहणार आहेत. मात्र सायंकाळी 7 ते दुसऱया दिवशी सकाळी 7 पर्यंत कर्फ्यु असणार आहे.

आता दिवसातून एकच बुलेटिन कोरोनासंबंधीची माहिती देण्यासाठी राज्य आरोग्य विभागाकडून रोज दोनवेळा बुलेटिन प्रसिद्ध केले जात होते. दुपारी 1 नंतर व सायंकाळी 6 नंतर बुलेटिनच्या माध्यमातून माहिती दिली जात होती. शनिवारपासून एकच बुलेटिन प्रसिद्ध करण्यात येत आहे. आरोग्य विभागाने दुपारचे बुलेटिन रद्द केले असून यापुढे रोज सायंकाळी एकच बुलेटिन असणार आहे.

Related Stories

वॉशिंगमशिन दुरुस्तीसाठी आले…अन् लाखांचे दागिने पळविले

Patil_p

मटका, गावठी दारू अड्डय़ांवर छापे

Patil_p

जायंट्स सखीतर्फे आदर्श शिक्षिका पुरस्कार

Patil_p

अंडी वितरणाविरोधात ‘चलो सुवर्णसौध’

Amit Kulkarni

चित्रपटांप्रमाणे स्टंट करणारा सिद्धार्थ

Amit Kulkarni

बेंगळूर हिंसाचारात एसडीपीआयचा सहभाग : मंत्री आर. अशोक

Abhijeet Shinde
error: Content is protected !!