तरुण भारत

चिखली पंचायत क्षेत्रातील कचऱयाला हेडलॅण्ड सडय़ावरील लोकांचा विरोध

प्रतिनिधी / वास्को

चिखली पंचायत क्षेत्रातील कचरा सडय़ावरील कचरा प्रक्रिया प्रकल्पात टाकला जात असल्याने सडय़ावरील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सडय़ावरील काही नगरसेवकांसह काही लोकांनी एकत्र येऊन कचऱयाचे ट्रक आल्यास रोखण्याची तयारी केली. मात्र, संध्याकाळी असा एकही ट्रक आला नाही.

नगरसेवक मुरारी बांदेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार सडा परीसरात गेल्या काही दिवसांपासून कचऱयाची दुर्गंधी येत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून वाढल्या होत्या.  सडय़ावरील कचरा गेल्या तीन महिन्यांपासून साफ करण्यात येत आहे. सफाईचे काम जवळपास पूर्ण झालेले आहे. त्यामुळे दुर्गंधी कशी निर्माण होते असा प्रश्न उपस्थित झाला होता. चिखली पंचायत क्षेत्रातील कचराही या प्रकल्पात टाकला जात असल्यानेच ही दुर्गंधी गेल्या काही दिवसांपासून निर्माण झाली होती असा संशय असून सडय़ावरील नागरिकांमध्ये त्यामुळे संताप पसरलेला आहे.

शनिवारी सकाळी चिखली पंचायत क्षेत्रातील कचरा घेऊन पाच ट्रक आले होते. त्यांना सडय़ावर हा कचरा टाकला. ही माहिती सडय़ावर पसरल्याने या प्रकाराला विरोध करण्याचा निर्णय काही स्थानिकांनी घेतला. संध्याकाळीही कचऱयाचे काही ट्रक येणार असल्याची माहिती पसरल्याने नगरसेवक मुरारी बांदेकर, दामू कासकर व शशिकांत परब यांच्यासह काही लोकांनी एकत्र येऊन कचऱयाचे ट्रक अडवण्याची तयारी केली. मात्र, सध्याकाळी असा ट्रक आलाच नाही. स्थानिक लोकांनी मात्र, सडय़ावरील प्रकल्पात चिखलीतील कचरा टाकण्यास विरोध केला आहे.

Related Stories

अवकाळी पावसामुळे कासावलीतील शेतकरी वर्ग हवालदिल

Patil_p

आरोपी गुल्शन गुसाई याला कोठडीत ठेवण्याचा आदेश

Patil_p

राज्यातील पर्यटन क्षेत्राचा विस्तार करणार

Patil_p

गोव्याचे 100 कोटीचे कर्जरोखे विक्रीस

Patil_p

सुभाष वेलिंगकर यांचा राजकारणातून सन्यास

Patil_p

वेतन थकबाकीप्रश्नी एमपीटीच्या कामगार संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर

Omkar B
error: Content is protected !!