तरुण भारत

घरच्यांसोबत वेळ व्यतित करतोय : हार्दिक जोशी

लॉकडाऊनमध्ये मालिकांचं चित्रीकरण बंद असल्यामुळे प्रेक्षकांचे लाडके कलाकार देखील घरीच आहेत. तुझ्यात जीव रंगला मधील सर्वांचा आवडता राणादा सध्या लॉकडाऊनमध्ये काय करतोय हे जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत. मालिकांचं चित्रीकरण बंद झाल्यापासून हार्दिक बोईसर येथे त्याच्या गावी कुटुंबासोबत राहतोय आणि सध्या मिळालेला वेळ सकारात्मक घालवण्याचा प्रयत्न करतोय.

  याबद्दल बोलताना हार्दिक म्हणाला, सध्या माझा दिनक्रम सकाळी लवकर उठणे, व्यायाम करणे, घरकामात आईला मदत करणे, घरातल्या अंगणात झाडे लावणे, संध्याकाळी घरच्यांसोबत खेळणे, पुन्हा व्यायाम करणे असा आहे. माझे कुटुंबीय मुंबईत असतात. पण, मी तुझ्यात जीव रंगला या मालिकेच्या चित्रीकरणानिमित्त गेली 4 वर्ष कोल्हापुरात आहे. तीन महिन्यानंतर 2 ते 3 दिवस सुट्टीमध्ये मी मुंबईला घरी यायचो. त्यामुळे 4 वर्षात घरच्यांना पुरेसा वेळ देता आला नाही. पण आता लॉकडाऊनमुळे पुन्हा एकदा मी परिवारासोबत क्वालिटी टाईम स्पेंड करतोय. गेली चार वर्ष मी आईच्या हातचं जेवण मिस करत होतो. पण आता मी आईच्या हातच्या पोळी भाजीचा पुरेपूर आस्वाद घेतोय. गेले 2 महिने शूटिंग बंद असलं तरीपण मी मिळालेल्या वेळात सिनेमे आणि वेब सिरीज बघतोय. कलाकार म्हणून त्यातील व्यक्तिरेखांचा अभ्यास करतोय. या दरम्यान घडलेली एक वाईट घटना म्हणजे काही दिवसांपूर्वी माझा कुत्रा बडी आम्हाला कायमचा सोडून गेला. माझ्यासाठी बडी म्हणजे माझं बाळ होतं. त्याच्या जाण्याचं दु:ख असलं तरी देखील त्याच्या शेवटच्या दिवसात त्याच्यासोबत चांगला वेळ घालवता आला याचं समाधान आहे.

Advertisements

Related Stories

सामाजिक विषयावर अवधूत गुप्तेंचे पहिलेवहिले रॅप सॉंग

Patil_p

उमा पेंढारकरचा काऊंसिलर ते अभिनेत्रीपर्यंतचा प्रवास

Patil_p

ऑस्ट्रेलियात जगातील सर्वात मोठी लवेंडर फार्म

Amit Kulkarni

मधुबाला साकारण्याची इच्छा

Amit Kulkarni

महिला पोलीस ठाण्यावर येणार संकट ?

Patil_p

शिवरायांचा शिवप्रताप रुपेरी पडद्यावर साकारणार

Patil_p
error: Content is protected !!