तरुण भारत

बायर्न म्युनिचच्या विजयात लेवान्डोवस्कीचे दोन गोल

वृत्तसंस्था/ म्युनिच

बायर्न म्युनिचचा स्ट्रायकर रॉबर्ट लेवान्डोवस्कीने गोलांचा वैयक्तिक दुष्काळ संपवित दोन गोल नोंदवल्यानंतर त्याच्या संघाने फॉर्च्युना डय़ुसेलडॉर्फ संघाचा 5-0 असा धुव्वा उडवित बुंदेस्लिगाचे विक्रमी 30 वे जेतेपद मिळविण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले.

Advertisements

सलग आठवे जेतेपद मिळविण्याच्या प्रयत्नात असणाऱया बायर्न म्युनिचने 29 सामन्यांत 67 गुण मिळविले असून दुसऱया स्थानावरील बोरुसिया डॉर्टमंडपेक्षा ते 10 गुणांनी आघाडीवर आहेत. लेवान्डोवस्कीने फॉर्च्युनाविरुद्धचा गोलांचा दुष्काळ संपवताना 43 व्या मिनिटाला गोल नोंदवल्यानंतर बायर्नला 3-0 अशी आघाडी मिळाली. त्याआधी मथायस जॉर्गेनसेनने स्वयंगोल करीत बायर्नला आघाडी मिळवून दिली होती तर बेंजामिन पॅव्हर्डने हेडरवर बायर्नचा दुसरा गोल केला होता. लेवान्डोवस्कीचे आता बुंदेस्लिगातील प्रत्येक संघाविरुद्ध गोल झाले असून फॉर्च्युनाविरुद्धच्या याआधीच्या पाच सामन्यांत त्याला एकही गोल करता आला नव्हता. याआधी डॉर्टमंडमध्ये असतानाही त्याला त्यांच्याविरुद्ध गोल करता आला नव्हता. त्याचे या मोसमातील सर्व स्पर्धांत मिळून 43 गोल झाले असून वैयक्तिक सर्वोच्च कामगिरीशी बरोबरी केली आहे. यापूर्वी 2016-17 च्या मोसमात त्याने 43 गोल केले होते.

बायर्नचे प्रशिक्षक हॅन्सी फ्लिक हे या क्लबचे असे पहिले प्रशिक्षक बनले आहेत, ज्यांनी पहिल्या 25 पैकी 22 सामने जिंकले आहेत. असे करताना त्यांनी पेप गार्डिओला यांचा 21 सामने जिंकण्याचा विक्रमही मागे टाकला. विक्रमापेक्षा ट्रॉफी जिंकणे जास्त महत्त्वाचे आहे, असे ते याबाबत बोलताना म्हणाले. लेवान्डोवस्कीने वैयक्तिक पहिला गोल केल्यावर मध्यंतरानंतर पाचच मिनिटांनी त्याने दुसरा गोल नोंदवला. डेव्हिसने दोन मिनिटानंतर संघाचा पाचवा गोल नोंदवून मोठा विजय निश्चित केला. 29 सामन्यानंतर बायर्नचे 86 गोल झाले असून 1973-74 मध्ये नोंदवलेला 84 गोलांचा विक्रमही त्यांनी मागे टाकला आहे. फॉर्च्युना संघ 16 व्या स्थानावर असून त्यांचे 27 गुण झाले आहेत.

Related Stories

पद्मावती रॉयल्स,पी.पी. रॉयल्स, पुष्पांजली, ओशोरा उपांत्य फेरीत

prashant_c

विदर्भच्या क्रिकेटपटूंचे विवाह लांबणीवर

Patil_p

ऑस्ट्रेलियन स्पर्धेत नागलला वाईल्डकार्डद्वारे प्रवेश

Patil_p

पंजाबची घोडदौड आज राजस्थान रॉयल्स रोखणार?

Patil_p

कौंटी सिलेक्टविरुद्ध भारताचा सराव सामना आजपासून

Patil_p

पीबीएल स्पर्धेचा शेवटचा टप्पा हैद्राबादमध्ये

Patil_p
error: Content is protected !!