तरुण भारत

वादळी वारा-विजेच्या गडगडाटाने गोजगा येथील शेतकऱयाचा मृत्यू

वार्ताहर/उचगाव

उचगाव परिसरामध्ये रविवारी दुपारी झालेल्या जोरदार वादळी पावसामध्ये झालेल्या गडगडाट व विजेमुळे गोजगा येथील शेताकडे गेलेले उत्तम बसवंत शहापूरकर यांचे जोरदार आवाजाने निधन झाले.

Advertisements

याबाबत सविस्तर माहिती अशी, की गोजगा येथील उत्तम शहापूरकर हे नेहमीप्रमाणे आपल्या शेताकडे गेले होते. शेतामध्ये काम करत असताना रविवारी अचानक दुपारी जोरदार वादळी पाऊस सुरू झाला. यावेळी जोरदार विजा आणि गडगडाट झाल्याने शेतात असलेले उत्तम शहापूरकर हे विजेच्या झालेल्या जोरदार आवाज सहन न झाल्याने ते शेतात कोसळले. यावेळी जोरदार पाऊसही सुरू होता. पाऊस संपल्यानंतर शेताकडे जाणाऱया काही लोकांनी उत्तम शहापूरकर हे शेतात पडलेले दिसले. लागलीच ही बातमी त्यांनी गावाकडे कळवली. यावेळी लोकांनी उत्तम यांना उपचारासाठी बेळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत असताना त्यांची वाटेतच प्राणज्योत मावळली.

उचगाव परिसरामध्ये रविवारी दुपारी जोरदार वादळी पाऊस झाल्याने काही भागांमध्ये जोरदार वीज पडली. या विजेच्या मोठय़ा आवाजाने व गडगडाटाने फार मोठे नुकसान झाले आहे.

 शहापूरकर हे कर्तबगार शेतकरी होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, एक मुलगा, भाऊ व बहिणी असा परिवार आहे. संबंधित शेतकऱयाला सरकारकडून मदत मिळावी, अशी समस्त गावकऱयांकडून मागणी होत आहे. सायंकाळी गावातील स्मशानभूमीत उत्तम शहापूरकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रक्षाविसर्जन सोमवारी सकाळी आठ वाजता होणार आहे.

Related Stories

इटनाळ येथे सापडलेले अर्भक सिव्हिलमध्ये

Rohan_P

ब्रुसेलोसिस प्रतिबंधक लसीकरण मोहीम 6 पासून

Omkar B

कृष्णेच्या पाणीपातळीत सहा फुटांनी वाढ

Patil_p

नशेच्या सौदागरांची पोलिसांबरोबर उठबस!

Patil_p

तापमान वाढले… पारा 37 अंशावर

Patil_p

मच्छे दुहेरी खून प्रकरणाची मास्टर माईंड महिला!

Patil_p
error: Content is protected !!