तरुण भारत

निती आयोगाच्या अधिकाऱ्याला कोरोनाची बाधा; कार्यालयाचा तिसरा मजला केला सील

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


देशात कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. देशाची राजधानी दिल्लीत तर कोरोनाबाधितांची संख्या 20 हजारच्या जवळ येऊन पोहचली आहे. त्यातच आता दिल्लीतील निती आयोगाच्या एका अधिकाऱ्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे दिल्लीतील कार्यालयाचा तिसरा मजला पूर्ण पणे सील करण्यात आला आहे. 

Advertisements


मिळालेल्या माहितीनुसार, निती आयोग कार्यालयातील एका अधिकाऱ्याचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे दिल्लीतील कार्यालयाचा तिसरा मजला सील करण्यात आला असून तेथे निर्जंतुकीकरणाचे काम सुरू आहे. तर या अधिकाऱ्याच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेतला जात आहे. 


दरम्यान, सध्या दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या 19844 झाली असून आता पर्यंत 473 लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. तर 8478 लोकांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 

Related Stories

गुरुवारी राज्यभरात ‘मास्क डे’

Patil_p

भारत-बांगलादेश ‘मैत्री सेतू’चे लोकार्पण

Patil_p

दिल्लीत गेल्या 24 तासात 340 नवे कोरोना रुग्ण; 04 मृत्यू

pradnya p

गोव्यात आजपासून इफ्फीला सुरुवात

Shankar_P

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निर्णय काही तासातच स्थगित

datta jadhav

दुबईतील रॉयल गोल्ड बिर्याणी

Patil_p
error: Content is protected !!